मुंबई, 12 नोव्हेंबर : एसटी महामंडळ ( st bus strike ) राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केल्यानंतर कर्मचारी मागे हटण्यास तयार नाही. त्यामुळे आता महामंडळला नव्या भरतीची गरज असेल तर ज्यांचे ट्रेनिंग पूर्ण झालं आहे त्यांना घेण्याचा विचार करू, असं संकेतच ST महामंडळाने दिले आहे.
ST महामंडळाचे व्यवस्थापीक संचालक शेखर चन्ने यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्मचाऱ्यांना परत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.
महामंडळला नव्या भरतीची गरज असेल तर ज्यांचे ट्रेनिंग पूर्ण झालं आहे त्यांना घेण्याचा विचार करू पण तसा अचानक कोणताही निर्णय अजूनपर्यंत झाला नाही, असं चन्ने यांनी स्पष्ट केलं.
'एसटीचा संचित तोटा कोटा 12 हजार कोटी होता. जो भरण्याचा प्रयत्न सुरू होता. सव्वाशे कोटी फटका बसला आहे. नुकसान झालं असेल तरी शासनाने मदत केली म्हणून पगार झाला एसटी कर्मचाऱ्यांना कुठेही धरणे, मोर्चा करण्यासाठी प्रतिबंध आहे. किमान आमचं नाही तर कोर्टाच्या आदेशाचे तरी पालन करा, असं आवाहन त्यांनी केलं.
कतरिना कैफसोबत लग्नाच्या चर्चेदरम्यान, विकी कौशलनं केला आपल्या आवडत्या मुलीचा...
'27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संप सुरू आहे. उच्च न्यायालय औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने नकार देऊन पण संप केला आहे खासगी वाहने आम्ही सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर यावं कोणी अडवणूक करू नये. आज 36 बसेस आम्ही विविध डेपोतून सोडल्या. 17 डेपोतून या बसेस सोडल्या त्यात 900 लोकांनी प्रवास घेतला खासगी वाहतूक मध्ये लूट होऊ नये यासाठी आम्ही आदेश दिले आहे, असंही शेखर चन्ने म्हणाले.
मॅकेनिकल स्टॅफ कामावर यायला सुरुवात झाली आहे. मागणी उच्च न्यायालय समोर विचाराधीन आहे. समिती नेमली आहे त्या वेळेनुसार ते ठरेल. कर्मचारी आम्हाला सांगत आहे की डेपो सुरू करा, आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय. आमची विनंती आहे की सर्वांनी यावे, अशी माहितीही शेखर चन्ने यांनी दिली.
आता Jio चा Laptop ही येणार? काय असतील JioBook चे फीचर्स, पाहा डिटेल्स
मशीन विकत घेतली तर टेक्निकल लोक नाही. झाडे लावायला मोठा खर्च नाही आलास वन विभागाने मोफत लोक बोलावली होती. गणवेशासाठी पूर्वी कापड द्यायचे मग शिलाईभत्ता द्यायचो. आधीच्या कपड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत होता, कापडासाठी अभ्यास करून कंत्राट केलं 60 कोटीत झाला. 10 -15 कोटी कदाचित कमी झाला असता पण आता त्यांना आपण बराच काही दिलं आहे, असं म्हणत शेखर चन्ने यांनी सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.