मुंबई, 12 नोव्हेंबर- विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या कतरिना कैफसोबतच्या (Katrina Kaif) लग्नामुळे चर्चेत आहे. बातमीनुसार, दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, विकीने सांगितले आहे की त्याला कोणत्या मुलीला आपला जीवनसाथी बनवायचं आहे. विकी 'वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' (Wild With Bear Grylls) या साहसी शोमध्ये दिसणार आहे. बेअर ग्रिल्ने बॉलीवूडच अभिनेता विकी कौशलचं इनक्रेडिबल गेस्ट म्हणून वर्णन केले आहे. या शोमध्ये विकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासह तो त्याची सर्वात मोठी भीतीही उघड करताना दिसणार आहे. पण सर्वात मोठी गोष्ट त्याच्या जोडीदाराबद्दल सांगितली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, विकी कौशलने बेअर ग्रिलच्या शोमध्ये सांगितले होते की, त्याचा जन्म एका छोट्या घरात झाला आहे. अभिनयाच्या निमित्तानं त्यानं इंजिनीअरिंगचं शिक्षण मधेच सोडलं. त्याला समुद्राच्या खोल पाण्याची भीती वाटते. परंतु सर्वांचं लक्ष वेधून घेतल ते म्हणजे त्याच्या भावी पत्नीबद्दलच्या खुलास्याने . वास्तविक, सध्या विकीने त्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या अहवालांदरम्यान, बेअर ग्रिलने त्याला विचारले 'तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मुलीला तुमची बायको बनवायला आवडेल? या प्रश्नाच्या उत्तरात विकीने सांगितले की, 'तुम्हाला नेहमी घरासारखा (कुटुंबासारखा)फील देणारी, तुम्ही कोणाशी कनेक्ट होऊ शकता. जो एकमेकांच्या उणीवा, चांगले गुण माहीत असूनही तुमच्यावर प्रेम करेल आणि समजून घेईल'. अशा मुलीशी लग्न करायचं आहे, असं विकीने सांगितलं आहे.
बातम्यांनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी दिग्दर्शक कबीर खानच्या घरी एंगेजमेंट केली आहे. मात्र, विकी आणि कतरिना या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या वृत्तावर मौन बाळगले आहे. शोच्या मध्यभागी, विकीला त्याच्या वडिलांकडून एक संदेश मिळतो, ज्यामुळे तो भावूक होतो. शाम कौशल म्हणतात, 'हॅलो पुत्तर, तुझ्यावर प्रेम आहे, मी थोडा तणावात आहे. जगाच्या काही ठिकाणी जिथे आपले कोणीच नसते तिथे टिकणे थोडे अवघड असते. पण मला माहित आहे की तुमच्यासोबत बेअर ग्रिल्स आहे जो जगातील सर्वात मोठा सर्वायव्हर आहे.कधीही हार मानू नका.विजेत्यासारखे बाहेर पडा, आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत.
(हे वाचा:'Govinda Naam Mera' मध्ये विकी-भूमि बनणार पती-पत्नी; तर गर्लफ्रेंड बनून कियारा..)
यावर विकी कौशल सांगतो की त्याचे वडील त्याचे सर्वात मजबूत आधारस्तंभ आहेत. आणि तो बेअर ग्रिल्सला त्याच्या आयुष्याबद्दल सांगतो. मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी होतो.माझ्या वडिलांना आपला मुलगा अभियंता होईल याचा आनंद झाला कारण माझ्या कुटुंबातील कोणीही 9-5 नोकरी केली नाही, दर महिन्याला चेक मिळतो, वीकेंडला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. म्हणूनच कुटुंबातील कोणीतरी असं आयुष्य जगणार आहे याचा त्यांना खूप आनंद झाला होता. पण मला अभिनेता व्हायचं होतं, म्हणून मी इंजिनीअरिंग सोडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal