• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • st bus strike : शरद पवार आणि राज ठाकरेंची बैठक संपली, महत्त्वाची माहिती समोर

st bus strike : शरद पवार आणि राज ठाकरेंची बैठक संपली, महत्त्वाची माहिती समोर


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली.

  • Share this:
मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्याच्या गेल्या काही दिवसांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप (st bus strike ) सुरू आहे. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनामुळे बैठक झाली पण कोणताही तोडगा निघू शकला नाही. तर दुसरीकडे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लवकरच, शरद पवार (sharad pawar) आणि राज ठाकरे (raj thackery)हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एकत्र भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईसह इतर नेते सोबत होते. या बैठकीनंतर नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली. प्रजेला मोफत निरोध वाटणारा CONDOM KING, सोबत देतो मोलाचा संदेश 'एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार साहेबांच्या कानावर घातले. इतर महामंडळांप्रमाणे सातवा वेतन एसटी महामंडळाला लागू करण्याची मागणी केली. केवळ एसटी प्रश्नावर चर्चा केली. ते तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. तसंच, मुख्यमंत्री यांची सर्जरी झाल्यानं राज ठाकरे शरद पवारांना भेटले. फायनान्सचा विषय असल्यानं पवारांना भेटलो. ते मार्ग काढतील असं वाटतंय. राज ठाकरे व शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील, अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली. कंगनाचे विधान चुकीचेच पण मोदी सरकारविषयी तिचे वक्तव्य बरोबर -चंद्रकांत पाटील शरद पवारांशी सकारात्मक चर्चा झाली. प्रत्येकवेळी लोकांनी शिवतीर्थावर येवून राज ठाकरेंना भेटायला हवं का? त्यांच्याकडे आलेल्या विषयाचा ते पाठपुरावा करतात. गंभीर विषय असल्यानं ते लगेच पवार साहेबांना भेटायला आले.  सातवा वेतन आयोग लागू केल्यास त्यांचा पगारवाढ होईल. मग ते संप मागे घेतील, असंही नांदगावकर यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published: