Home /News /mumbai /

Thane Crime: क्षुल्लक कारणावरुन मुलगाच उठला जीवावर, छातीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून आईची निर्घृण हत्या

Thane Crime: क्षुल्लक कारणावरुन मुलगाच उठला जीवावर, छातीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून आईची निर्घृण हत्या

Murder in Thane: ठाण्यातील एका मुलानं आपल्या आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून तिची निर्घृण हत्या (Son murdered mother) केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

    ठाणे, 20 जुलै: छातीत स्क्रू ड्रायव्हर (Screwdriver) खूपसून ठाण्यात एका महिलेची निर्घृण हत्या (Brutal Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानं क्षुल्लक कारणातून हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातून आरोपी मुलाला अटक (Son arrest) केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल एलझेंडे असं अटक केलेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे. तो आपली आई उर्मिला एलझेंडे यांच्यासोबत मुंब्रा शहरातील रेतीबंदर परिसरात वास्तव्याला होता. विविध कारणांवरून आरोपी विशालचे आपल्या आईसोबत नेहमी खटके उडत होते. आरोपी विशाल हा आपल्या कमाईतून पैशांची उधळपट्टी करायचा. पण पैसे संपल्यानंतर तो आईच्या मागे पैशांसाठी तगादा लावायचा. आईनं पैसे न दिल्यास मायलेकात नेहमी खटके उडायचे. पण मुलाची पैसे मागण्याची सवय मात्र जात नव्हती. हेही वाचा-मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त; वर्षभर केला जात होता रेप सोमवारी दुपारी देखील पैशांवरुन मायलेकांमध्ये पैशांवरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी विशालनं संतापाच्या भरात जवळचं पडलेल्या स्क्रू ड्रायव्हरनं आईच्या छातीत गंभीर वार केला. हा वार इतका भयंकर होता, की ज्यामध्ये माऊलीनं जागीच जीव सोडला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आणि उर्मिला एलझेंडे रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हेही वाचा-गोळीबाराच्या बदल्यासाठी दिली हत्येची सुपारी; पुण्यातील नगरसेवकाचा कांड उघडकीस मुंब्रा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विशालला अटक केली. मयत उर्मिला एलझेंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Thane

    पुढील बातम्या