Home /News /crime /

मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त; वर्षभर केला जात होता बलात्कार

मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त; वर्षभर केला जात होता बलात्कार

तरुणाने अनेक डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार केलं होतं. त्याने आपल्या प्रोफाइलवर मेन्यू लावला होता. यानुसार तो विविवध व्हिडीओ आणि शोसाठी 500 ते हजार रुपयांपर्यंत चार्ज करीत होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार 28 ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या अकाऊंटमध्ये तब्बल 6 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. तो दररोज 3 ते 4000 रुपयांची कमाई करीत होता.

तरुणाने अनेक डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार केलं होतं. त्याने आपल्या प्रोफाइलवर मेन्यू लावला होता. यानुसार तो विविवध व्हिडीओ आणि शोसाठी 500 ते हजार रुपयांपर्यंत चार्ज करीत होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार 28 ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या अकाऊंटमध्ये तब्बल 6 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. तो दररोज 3 ते 4000 रुपयांची कमाई करीत होता.

तरुणीने याबाबत आपल्या मैत्रिणीला सांगितलं तर उलट तिनेही धमकी देऊन गप्प राहायला सांगितलं.

    भोपाळ, 19 जुलै : भोपाळमधून (Bhopal) एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेसोबत तिच्या मैत्रिणीचा मोठा भाऊ एक वर्षापर्यंत बलात्कार करीत होता. महिलेने जेव्हा मैत्रिणीला याबाबत सांगितलं तर तिनेच उलट महिलेला धमकी दिली. भावाविरुद्ध कोणाला सांगितलं तर तुला बदनाम करेन अशी धमकी दिली. यानंतर ती महिलेला जबरदस्ती इंदूर येथे घेऊन गेली. येथे पुन्हा मैत्रिणीच्या भावाने कोल्ड ड्रिंक्समध्ये नशेचं औषध टाकून तिला प्यायला दिलं आणि बलात्कार केला. मात्र वारंवार हा प्रकार घडत असल्यामुळे शेवटी महिलेने याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आता महिलेची मैत्रिण आणि तिच्या भावाविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. निशातपुरा येथील करोंद भागात राहणारी 30 वर्षीय महिला हाऊस वाइफ आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, महिलेने मैत्रिण आणि तिच्या भावाविरोधात बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप केला आहे. महिलेने सांगितलं की, महिलेने सांगितलं की, तिची मैत्रिण पिंकी नेहमी घरी येत-जात होती. यादरम्यान पिंकीने तिचा भाऊ लोकेश रघुवंशी यांच्याशी ओळख करवून दिली. हे ही वाचा-लग्नानंतर पहिल्या प्रियकरासोबत पुन्हा जुळलं सूत, तरुणीच्या हत्येने झाला शेवट लोकेश हा इंदूर येथे राहतो, मध्ये मध्ये तो भोपाळला येत असतो. यादरम्यान लोकेश महिलेच्या घरी येऊ लागला होता. 7 जून 2020 रोजी दुपारी ती घरी एकटी होती. यादरम्यान लोकेश घरी पोहोचला आणि दरवाजा आतून बंद केला. धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. बदनामीच्या भीतीने ती गप्प राहिली. दुसऱ्या दिवशी तिने पिंकीला याबाबत सांगितलं. तर पिंकीने भावाची साथ दिली. यावर ती म्हणाली की, भावाने बरोबरच केलं. तो तुझ्यावर प्रेम करू लागला आहे. जर कोणाला याबाबत सांगितलं तर तुझी बदनामी करीन. त्यानंतर जेव्हा जेव्हा लोकेश भोपाळ येत असे तो महिलेवर बलात्कार करीत होता. पिंकी भावाला रोखण्याऐवजी त्याला साथ देत होती. महिलेने आरोप केला आहे की, गेल्या 10 जुलै रोजी पिंकी काही कारण सांगून तिला इंदूर घेऊन गेली. पिंकी तिला थेट लोकेशकडे घेऊन गेली. येथे लोकेशने कोल्ड ड्रिक्समध्ये नशेचं औषध देऊन महिलेवर पुन्हा बलात्कार केला. विरोध केल्यानंतर लोकेश तिला इंदूरला सोडून रळून गेला. महिला कशीबशी भोपाळला पोहोचली आणि रात्री 10 वाजता FIR दाखल केला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bhopal News, Crime news, Rape

    पुढील बातम्या