नाशिक हादरलं! दुचाकी अडवून महिलेला कारमध्ये टाकलं, बलात्कार करत काढले अश्लील फोटो

नाशिक हादरलं! दुचाकी अडवून महिलेला कारमध्ये टाकलं, बलात्कार करत काढले अश्लील फोटो

Rape in Nashik: गेल्या आठवडाभरात बलात्काराच्या विविध घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. पुणे, मुंबई, अमरावती आणि ठाणे येथील बलात्काराचे गंभीर प्रकार ताजे असताना, आता नाशिक येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:

नाशिक, 12 सप्टेंबर: गेल्या आठवडाभरात बलात्काराच्या विविध घटनांनी महाराष्ट्र (Rape in Maharashtra) हादरला आहे. पुणे, मुंबई, अमरावती आणि ठाणे येथील बलात्काराचे गंभीर प्रकार ताजे असताना, आता नाशिक (Nashik) येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एक महिला आपल्या दुचाकीनं जात असताना नराधमानं आपली चारचाकी दुचाकीला आडवी घालून (Obstructed bike) तिला कारमध्ये टाकत तिच्यावर बलात्कार (Rape in car) केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं बलात्कार करतानाचे अश्लील फोटो (Clicked Obscene photos) काढले आहेत.

संबंधित घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा शिवारात घडली आहे. याठिकाणी आरोपीनं पीडित महिलेची दुचाकी अडवून कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला आहे. लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी पीडित महिला दुचाकीवरून जात होती. दरम्यान पंचाळे-कोळपे रस्त्यावरून जात असताना आरोपीनं तिचा पाठलाग सुरू केला. महिलेनं वेगात दुचाकी चालवायला सुरुवात केली.

हेही वाचा-प्रेमविवाहानंतर पतीच जीवावर उठला; 8 वर्षांच्या संसाराचा झाला हृदयद्रावक शेवट

पण शहा शिवारात आरोपीनं पीडित महिलेला गाठलं. यानंतर आरोपीनं बळजबरी करत पीडितेला आपल्या कारमध्ये टाकून दरवाजे  बंद केले. यावेळी महिलेनं प्रतिकार करत आरडाओरडा केला असता, आरोपीनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीनं कारमध्ये पीडित महिलेवर बलात्कार केला. तसेच बलात्कार करतानाचे अश्लील फोटोही त्याने क्लिक केले.

हेही वाचा-उल्हासनगर: हातोड्याच्या धाक दाखवत केलं अपहरण, आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी

शिवाय या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकीही आरोपीनं दिली. या प्रकरणी पीडित महिलेनं वावी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. प्रशांत राजाराम सांगळे असं संशयित आरोपीचं नाव असून तो सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील रहिवासी आहे. या घटनेचा पुढील तपास वावी पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: September 12, 2021, 3:58 PM IST

ताज्या बातम्या