मुंबई, 20 जून : मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery) यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केल्यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. पण, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी या पत्रावर संशय व्यक्त केला आहे. प्रताप सरनाईक यांची गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते अज्ञातवासात होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र 9 जून रोजी लिहिण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 तारखेला हे पत्र मुख्यमंत्री सचिवालयात पोहोचलं. तुम्हालाही आहे हेअरबॅण्ड मनगटावर बांधायची सवय? होतील गंभीर परिणाम पण, हे पत्र प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या दबावाखाली लिहिले असल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ईडीकडून प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे, या पत्रात प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडत भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केली आहे. ‘भाजपशी जुळवून घ्या’ तसंच, ‘पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.’ असंही सरनाईक म्हणाले आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करायची आहे? जाणून घ्या सोपी प्रक्रिया कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे त्याला कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबीयांवर सुद्धा सतत आघात होत आहे, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंजवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, अशी व्यथाही सरनाईक यांनी मांडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







