मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लसीकरणाच्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करायची आहे? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

लसीकरणाच्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करायची आहे? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

File photo

File photo

आजपर्यंत आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे महत्वाचे दस्तावेज समजले जात. परंतु, त्यात आता लसीकरण प्रमाणपत्राची भर पडलेली आहे. त्यामुळे या प्रमाणपत्रावरील माहिती बिनचूक असणं आवश्यक आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 20 जून: देशात सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची कमी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. परंतु, आता तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. यासर्व परिस्थितीत देशात लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. लसीकरण नोंदणीसाठी नागरिक कोविन अॅपचा (COWIN App) वापर करत आहेत. लसीकरण झाले की त्यांना त्यासंबंधी एक प्रमाणपत्र (Certificate) देण्यात येत आहे. आजपर्यंत आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे महत्वाचे दस्तावेज समजले जात. परंतु, त्यात आता लसीकरण प्रमाणपत्राची भर पडलेली आहे. त्यामुळे या प्रमाणपत्रावरील माहिती बिनचूक असणं आवश्यक आहे. मात्र काही कारणांनी या माहितीत त्रुटी असल्यास त्यात आता नागरिकांना सुधारणा करता येणार आहे.

एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, कोविड लस घेतल्यानंतर नागरिकांना एक प्रमाणपत्र देण्यात येते. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एक प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट देण्यात येते आणि दुसरा डोस घेतल्यानंतर अंतिम प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्रावर 13 अंकी बेनिफिशियरी कोड (Beneficiary Code) असतो, यामाध्यमातून तुम्ही डोससंबंधी सर्वांगीण माहिती मिळवू शकता. यात डोस कधी घेतला, कोणत्या कंपनीची लस होती, आरोग्य अधिकाऱ्याचे नाव आणि लसीकरण केंद्राचे नाव आदींचा समावेश असतो. परंतु, काही कारणांनी या प्रमाणपत्रावरील तुमचे नाव, जन्मतारीख किंवा फोटा आईटीमध्ये काही चूक असेल तर ती तुम्ही दुरुस्त करुन सुधारित प्रमाणपत्र डाऊनलोड करु शकता.

हे ही वाचा-कोरोना लशीमुळे पहिल्या मृत्यू प्रकरणानंतर मोदी सरकारकडून आणखी मोठा खुलासा

अशी करा सुधारणा

- COWIN.gov.in या वेबसाईटवर जावे. त्यानंतर रजिस्ट्रेशन/ साइन इन युवरसेल्फ या ऑप्शनवर क्लिक करावे.

- लसीकरणावेळी वापरलेला मोबाईल क्रमांक त्यात भरावा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल.

- ओटीपी आल्यानंतर व्हेरिफाय आणि प्रोसीड वर क्लिक करावे. त्यानंतर Rise an Issue  या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर सिलेक्ट द मेंबर आणि नंतर Correction In Certificate वर क्लिक करावे.

- त्यानंतर सेल्फ करेक्शन हा पर्याय निवडून, आपली माहिती दुरुस्त करावी. परंतु, यावेळी हे लक्षात घ्यावे की तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, जेंडर आणि आधार क्रमांक किंवा पासपोर्ट क्रमांक दुरुस्त करु शकता.

- त्यानंतर करेक्ट इन्फोर्मेशन वर एंटर करावे. त्यानंतर Continue वर क्लिक करुन सबमिट करावे.

यापध्दतीने तुम्ही लसीकरण प्रमाणपत्रावरील माहिती दुरुस्ती करु शकता. मात्र हे लक्षात ठेवा की ही माहिती केवळ एकदाच दुरुस्त करता येते.

यापूर्वी ही सुविधा नव्हती

यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्रावरील माहिती दुरुस्त करण्याची सुविधा देण्यात आली नव्हती. मात्र केंद्र सरकारने COWIN या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र या प्रमाणपत्रावरील माहिती तुम्ही केवळ एकदाच दुरुस्त करु शकता. ही दुरुस्ती झाल्यानंतर हे प्रमाणपत्र तुमच्या जुन्या प्रमाणपत्राच्या जागी अपडेट होईल.

First published:

Tags: Corona updates, Corona vaccination