नवी दिल्ली, 02 डिसेंबर: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्वांचंच नुकसान झालं आहे. अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत आणि देशभरात लाखो लोकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची (Unemployment) परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी भारत सरकार लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. लोकांना सरकार अनेक संधी उपलब्ध होत आहे, त्यात DRDO ने लोकांसाठी जॉब इंटरव्ह्यू आयोजित केले आहेत.
डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाइझेशनने (DRDO) ज्युनिअर रिसर्च फेलाशीपअंतर्गत पदांवर भरती सुरु केली आहे. विशेष बाब म्हणजे याकरता थेट एका मुलाखतीमधून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. एकूण 16 जेआरएफची निवड केली जाणार आहे. जानेवारीमध्ये निवड प्रक्रिया होईल. इंटरव्यू 4 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान असेल. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 31 हजार रुपये पगार मिळणार आहे
काय आहे पात्रता?
डीआरडीओच्या जेआरएफ भरतीच्या मुलाखतीमध्ये भाग घेण्यासारखा संबंधित उमेदवाराकडे इंजिनियरिंगची पदवी असणं आवश्यक आहे. उमेदवाराने फर्स्ट क्लासमध्ये बीई किंवा बीटेक केलेलं असावं. यासोबतच उमेदवार नेट/गेटची परीक्षा देखील पास असावा किंवा संबंधित विषयात मास्टर डिग्री असायला हवी.
(हे वाचा-चंदा कोचर यांना आणखी एक मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका)
रिक्तपदांचे तपशील
डीआरडीओमध्ये ज्युनियर रिसर्च फेलाशीपच्या ज्या पदांवर भरती होणार आहे, त्यात मॅकेनिकल इंजीनियरिंग 6 जागा, ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग 3 जागा, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग 3 जागा, कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग 4 जागा आहेत. अहमदाबादमधील वहान्नगरात असलेल्या व्हेइकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये संबंधित उमेदवाराला मुलाखतीसाठी जावं लागणार असून सोबत अर्ज आणि योग्य मार्कशीट, फोटो आयडी कार्ड, पॅन कार्ड इत्यादी घेऊन जावं लागेल.
(हे वाचा-कोरोना लशीचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम, 5 महिन्यातील नीचांकी स्तरावर सोनं)
या मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड होईल आणि त्याला डीआरडीओसारख्या देशातील महत्त्वाच्या संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळेल. एक चांगलं करिअर करण्याची संधी या उमेदवारांना मिळणार असून डिफेन्समधील या संधीचा फायदा पात्रता पूर्ण करणाऱ्या सर्व उमेदवारांनी घ्यायला हवा. सामान्यपणे प्रवेश परीक्षा आणि इतर परीक्षा देऊन नोकरीसाठी निवड केली जाते पण इथं केवळ मुलाखत घेऊन निवड होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Government employees, Job