Home /News /money /

कमाईचा हिट फॉर्म्यूला! 5000 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो, सरकार देखील करेल मदत

कमाईचा हिट फॉर्म्यूला! 5000 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो, सरकार देखील करेल मदत

भारतात एक मोठा वर्ग आहे जो चहाप्रेमी आहे. त्यात 'कुल्हड' अर्थात मातीच्या कप्समधून चहा पिण्याची मजा काही औरच असते. सध्या या कुल्हडची मागणी वाढू लागली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये, बस डेपोत आणि विमानतळांवर देखील कुल्हडमधून चहा मिळतो. अशावेळी तुम्ही याकडे एक व्यवसाय म्हणून पाहू शकता.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 02 डिसेंबर: जर तुम्ही नोकरी व्यतिरिक्त अतिरिक्त कमाईचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमचा स्वत:चा असा छोटेखानी व्यवसाय  (business opportunity) सुरू करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशी बिझनेस आयडिया (Small Business Idea) सांगणार आहोत, ज्यातून दर महिन्याला तुमची चांगली कमाई होईल. भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत.  त्यात 'कुल्हड' अर्थात मातीच्या कप्समधून चहा पिण्याची मजा काही औरच असते. सध्या या कुल्हडची मागणी वाढू लागली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये, बस डेपोत आणि विमानतळांवर देखील कुल्हडमधून चहा मिळतो. अशावेळी तुम्ही कुल्हड बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.  जाणून घ्या तुम्ही कशाप्रकारे हा व्यवसाय सुरू करू शकाल. सरकार देत आहे प्रोत्साहन सरकार सध्या कुल्हडची मागणी वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. अलीकडेच केंद्रीय रस्ता आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कुल्हडना प्रोत्साहन देण्यासाठी प्लास्टिक आणि कागदी कपात चहा देण्यास बंदी घालण्याची मागणी केली होती. (हे वाचा-2021 च्या सुरुवातीलाच सोन्याची झळाळी उतरणार! 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव) दरम्यान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी अशी घोषणा केली आहे की, येणाऱ्या काळात देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर कुल्हडमध्येच (Kulhads)चहा (Tea)मिळेल. प्लास्टिक कपला (Plastic Cups)पर्याय म्हणून कुल्हडमध्ये चहा देण्यात येईल, स्टेशनवर प्लास्टिक कप पूर्णपणे बंद होणार असल्याचं ते म्हणाले. राजस्थानच्या अलवरमध्ये ढिगावडा-बांदीकुई रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण उद्घाटन सोहळ्यात गोयल यांनी ही घोषणा केली. सध्या देशात जवळपास 400 रेल्वे स्टेशन्सवर कुल्हडमधूनच चहा दिला जातो. येत्या काळात देशातील प्रत्येक स्टेशनवर केवळ कुल्हडमधूनच चहाची विक्री केली जाईल, अशी योजना आहे. प्लास्टिक मुक्त भारतमध्ये रेल्वेचं हे योगदान असणार आहे. तसंच या योजनेमुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचंही गोयल म्हणाले. (हे वाचा-चंदा कोचर यांना आणखी एक मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका) कुल्हड व्यवसायाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार देशभरातील  कुंभारांना वीजेवर चालणारे चाक देत आहे, ज्यावर कुल्हडसह मातीची  इतर भांडीही बनवता येतात. त्यानंतर सरकार या कुंभारांकडून चांगल्या किंमतीत कुल्हड खरेदी करते. 5 हजार रुपये  गुंतवून सुरू करा हा व्यवसाय सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत कमी रक्कम गुंतवून हा व्यवसाय सुरू करता येईल. याकरता तुम्हाला थोड्या जागेसह 5000 रुपयांची आवश्यकता आहे. यावर्षी सरकारने 25 हजार विद्युत चाकं वाटल्याची माहिती खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी दिली आहे. किती रुपयांत विकता येतील कुल्हड? चहा-कॉफी पिण्यासाठी वापरण्यात येणारं कुल्हड स्वस्त असण्याबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने देखील सुरक्षित आहे. सध्याच्या दरानुसार कुल्हडचा दर 50 रुपये शेकडा आहे. याप्रकारे लस्सी आणि दुधाच्या कुल्हडची किंमत 150 रुपये शेकडा आहे. मागणी वाढल्यामुळे यापेक्षा उत्तम दराने विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हे वाचा-SBI अलर्ट! सोशल मीडिया वापरताना सावधान अन्यथा खातं रिकामं होण्याची भीती...) शहरांमध्ये कुल्हडच्या चहाची किंमत 15-20 रुपये आहे. जर हा व्यवसाय योग्य पद्धतीने चालवला आणि कुल्हड विकण्यावर लक्ष केंद्रीत केलं तर दिवसाला 1000 रुपयांपर्यंत बचतही होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या