मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /हिंदुत्व ‘खतऱ्या’त येत असेल तर...,शिवसेनेची भाजपवर जळजळीत टीका

हिंदुत्व ‘खतऱ्या’त येत असेल तर...,शिवसेनेची भाजपवर जळजळीत टीका

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 जानेवारी : 'महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे' असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून टीका करण्यात आली आहे.

'पराभवाचे हादरे बसू लागले की, भारतीय जनता पक्ष त्यांचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक ‘खतऱ्या’त आला असून धर्मांतरविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’ अशा मुद्दय़ांवर भाजप व त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले गेले, पण आघाडीवर भारतीय जनता पक्षाचेच लोक होते. ‘‘आम्ही सगळे हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत,’’ असे या मंडळींनी जाहीर केले, पण हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे' अशी जळजळीत टीका सेनेनं केली.

('सावित्री झाल्या आता जोतिबा..' चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना; म्हणाल्या..)

'महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे. या आधीच्या काळात ‘इस्लाम खतरे में है’ असे मुस्लिम समाज म्हणत असे. आता हिंदुत्ववादी वगैरे म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत ‘हिंदू खतरे में’ असे म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे. केंद्रात किंवा महाराष्ट्रात ‘मुस्लिम लीग’ किंवा ‘एमआयएम’सारख्यांचे राज्य असते, तर ‘हिंदू आक्रोश मोर्चा’ला अर्थ होता. प्रश्न ‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराचा असेल तर त्यावर कायद्याने चर्चा व्हायलाच हवी. नव्हे, याबाबतीत कठोर कायदे व्हायला हवेत. याबाबत कुणाच्याच मनात शंका नाही, पण एखाद्या निवडणुकीचे बिगुल वाजले की, भाजपशासित राज्यांत अचानक हिंदू ‘खतऱ्या’त येण्याची हालचाल सुरू होते. गुजरात, उत्तराखंड, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांत हिंदुत्व ‘खतऱ्या’त येत असेल तर त्या राजवटीतच दोष आहेत' अशी टीका सेनेनं केली.

('तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या..' बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावरुन रोहीत पवार यांचा थेट CM वर)

'‘हिंदू जन आक्रोश’ हा प्रकार फक्त निवडणुका किंवा राजकीय फायद्यासाठीच असेल तर ती हिंदुत्वाशी बेइमानी ठरेल. धर्मांतराचा मुद्दा गंभीर आहे. आमिष दाखवून धर्मांतर करण्याचे निरनिराळे मार्ग आहेत, पण त्याबाबत राजकारण करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. सक्तीचे धर्मांतर हा फक्त गंभीर मुद्दा नाही, तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेवरही परिणाम होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले, पण पुन्हा प्रश्न तोच आहे की, देशात प्रखर हिंदुत्ववाद्यांचे शक्तिमान राज्य असतानाही ही सक्तीची धर्मांतरे का होत आहेत? हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे अपयश आहे व त्या अपयशाचा निषेध करण्यासाठी हिंदू मुंबईत रस्त्यावर उतरला असेल तर काय चुकले? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.

First published:

Tags: Shivseana