मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'सावित्री झाल्या आता जोतिबा..' चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना; म्हणाल्या..

'सावित्री झाल्या आता जोतिबा..' चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना; म्हणाल्या..

चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना

चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना

चित्रा वाघ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

मुंबई, 29 जानेवारी : कपड्यांवरुन मॉडेल उर्फी जावेदशी पंगा घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ गेल्या काही दिवसात सतत्याने चर्चेत होत्या. मात्र, आता चित्रा वाघ यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी पुण्यातील हळदी-कुंकाच्या कार्यक्रमामध्ये ‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे,’ असे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ जारी करत चित्रा वाघ यांचा खरफूस समाचार घेतला आहे.

चंद्रकांत दादा यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी : चित्रा वाघ

“काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ यांचे मानसिक संतुलन ढासळलेले : अमोल मिटकरी

चित्रा वाघ यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. “आम्ही चित्रा वाघ यांना खूप प्रगल्भ समजत होतो. मात्र, भारतीय जनता पक्षात राहिल्याने त्या मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वागत आहेत. आज त्यांनी कमाल केली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना चक्क महात्मा जोतिराव फुले यांच्यासोबत केली आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांना खूश करण्यासाठी असे वक्तव्य करत आहात. अशी वक्तव्ये जरूर करावीत, मात्र यामध्ये महापुरुषांना घेऊ नये. अगोदरच तुमचा पक्षा गोत्यात आला आहे, आणखी त्यात आग ओतण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही एक बहिण आहात म्हणून तुमचा सन्मान आहे. पण, महात्मा फुले यांचा तुम्ही केलेला अपमान ही महाराष्ट्राची माती विसरणार नाही. शेवटी राज्यपाल आणि तुमच्यात काहीच फरक राहिला नसेल तर तुमची संगत चुकलेली आहे. याचे परिणाम तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील एवढं लक्षात ठेवा." अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

First published:

Tags: Chitra wagh, Pune