मुंबई, 09 फेब्रुवारी : ‘माझे सहकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतोच आम्ही राजकीय शत्रू आहोत आणि शत्रू कायम राहणार. पण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तर त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊतांनी टीका केली. ‘महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अराजकता आणि अनागोंदी आहे. सामान्य जनता व्यापारी वर्ग महिला एका भीतीच्या वातावरणाखाली आहेत. आदित्य ठाकरेंसोबत जो प्रसंग घडलेला आहे, पोलीस कितीही सारवासारव करू दे पण हल्ला झाला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर देखील हल्ला झाला असे अनेक प्रकार रोज घडत आहेत. गृहमंत्री यांनी आपला जुना कालावधी आणि आताचा कालावधी याची तुलना करावी. गृहमंत्री सुद्धा दिवस ढकलत आहेत असं वाटतंय. त्यांनी विरोधकांमधील अनेकांच्या सुरक्षा कमी केली आहे. त्यातून काही घातपात होऊ शकतो. नेमका राज्य सरकारचा डाव काय आहे, अशी टीका राऊतांनी केली. (मविआ सरकार पडण्याचे शिवसेनेनं फोडले नाना पटोलेंवर खापर, केला गंभीर आरोप) ‘जनमताचा रेटा हा आमच्या बाजूने आहे जी प्रचंड गर्दी उसळत आहे त्यामुळे त्यांच्या पोटात गोळा आहे. त्यामुळे सर्व गैरवापर करून दहशत निर्माण करून रक्तपात करून हे थांबवता येईल का यासाठी हे सर्व सुरू आहे. वरळीच्या सभेचा व्यवस्थित कार्यक्रम झाला आहे, तेथे दहशतीने माणसं गोळा करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांना जण माणसं घाबरी नाहीत घरात बसली. कोळ्यांच्या टोप्या घालून तिथे कोण बसलं होतं हे तुम्हाला माहित आहे. याचा फटका त्यांना प्रत्येक निवडणुकीत बसणार आहे, असा टोलाही राऊतांनी शिंदे गटाला लगावला. (राज्यात चाललं काय? काँग्रेसच्या महिला आमदाराच्या पाठीत थापड मारून तरुण पळाला, पोलिसांनी अखेर पकडले) ‘जर विधानसभेच्या खुर्चीवर नाना पाठवले असते तर चित्र वेगळं असतं परंतु हे अध्यक्षपद अचानक रिकामा झाल्यानंतर आम्हाला संधी मिळाली. राज्यपालांनी निवडणुका होऊ दिली नाही त्याचा फटका आता बसला हे सत्य आहे, असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







