मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मविआ सरकार पडण्याचे शिवसेनेनं फोडले नाना पटोलेंवर खापर, केला गंभीर आरोप

मविआ सरकार पडण्याचे शिवसेनेनं फोडले नाना पटोलेंवर खापर, केला गंभीर आरोप

 अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते.

अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते.

अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 फेब्रुवारी :  'महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली'  असं म्हणत शिवसेनेनं नाना पटोले यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली.

काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचा वाद शिगेला पोहोचला आहे. थोरात यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून दोन्ही नेत्यांना शिवसेनेनं सल्ला दिला आहे. यावेळी शिवसेनेनं नाना पटोले यांना महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास दोषी धरलं आहे.

'महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही. विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते' अशी खदखद पहिल्याांदाच शिवसेनेनं बोलून दाखवली.

(थोरातांसाठी शिवसेना उतरली मैदानात, काँग्रेस हायकमांडला दिला सबुरीचा सल्ला)

पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही व त्याचाच फायदा पुढे ‘खोके’बाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील ‘महाशक्ती’स मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल' असा थेट आरोपच सेनेनं केला आहे.

('ईडीने तुम्हाला एकत्र आणलं,' पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर प्रहार)

'पटोले हे मेहनती आहेत व भारतीय जनता पक्षात बंड करून ते काँग्रेस पक्षात आले. ते पक्षवाढीसाठी कष्ट घेतात, पण संकटकाळात ज्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले अशा ‘घराण्यां’शी नाहक पंगा घेऊन राज्यात त्यांचा पक्ष कसा वाढणार? पटोले यांनी वाद न वाढवता पक्ष पुढे नेला तर 2024 साली महाविकास आघाडीस नक्कीच फायदा होईल. नाहीतर 2024 आधी कमळाबाईवरील भुंगे काँग्रेसच्या उरलेल्या मधाच्या पोळय़ावर बसतील' असा सल्लाही सेनेनं पटोलेंना दिला.

First published:
top videos