Home /News /mumbai /

Video शिंदे- भाजप सरकार येताच, भास्कर जाधव लागले शेतीच्या कामाला

Video शिंदे- भाजप सरकार येताच, भास्कर जाधव लागले शेतीच्या कामाला

समाजकारण व राजकारणात कितीही व्यस्त असले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात.

    चिपळून, 6 जुलै : विधानभवनात बहुमत चाचणीदरम्यान शिवसेनेच्या (Shivsena) वतीने आक्रमक बोलणारे भास्कर जाधव  (Bhaskar Jadhav) सत्तांतरानंतर आपल्या गावाकडील शेतीत रमले आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव त्यांच्या चिपळूण (Chiplun) तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये काम करतना दिसले. भास्कर जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. त्यांनी कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य त्यांना वर्षभर पुरतं. समाजकारण व राजकारणात कितीही व्यस्त असले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात. पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पायाची घोटशीर तुटली होती आणि त्यानंतर काही दिवस ते चालू शकले नव्हते. परंतु, त्यावर त्यांनी मात केली. एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते पूर्वीसारखेच उत्साहाने शेतीच्या कामात झोकून देताना दिसले. शपथपत्र लिहून देणारे शाखाप्रमुख शिंदे गटाकडे निघाले, शिवसेनेची भिंतही कोसळली! विधानसभेतील आपल्या भाषणात त्यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपचा समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भापज पहिल्या दिवसापासून कशा प्रकारे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होता याचा पाढाचा त्यांनी वाचून दाखवला. भाजपने कोरोना संकटातीह राजकारण सोडलं नाही असा आरोपही त्यांनी केला. Pune Bhushi Dam : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो भाजपने कधी भोंग्याचा मुद्दा उचलून धरला, तर कधी हनुमान चालिसा विषय आणला. कधी नुपूर शर्मा, तर कधी सुशांतसिंह अशा पद्धतीने राज्यातील सत्ता पाडण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचं भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bhaskar jadhav, Shivsena

    पुढील बातम्या