मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune Bhushi Dam : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो

Pune Bhushi Dam : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो

लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झाले आहे. (lonavala bhushu dam) धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली

लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झाले आहे. (lonavala bhushu dam) धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली

लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झाले आहे. (lonavala bhushu dam) धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली

  पुणे, 06 जुलै : मागच्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने (pune heavy rainfal) जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान पुण्यात पाणी कपातीचे संकट ओढावले (pune water crisis) असताना पुणेकरांना आनंदाची बातमी समोर आली आहे. लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झाले आहे. (lonavala bhushu dam) धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली आणि 250 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थान असलेले भुशी धरण तुडुंब (bhushi dam pune) भरल्याने पायऱ्यावरून ओसंडून वाहणारे धरणाचे पाणी पर्यटकांना भुरळ घालत आहे.

  तसेच मावळ खोऱ्यातही पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे.  मावळातील पश्चिम खो-यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने याठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोळम आणि इंद्रायणी भातांची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. तर मावळ तालुक्यात पारंपारिक, चारसुत्री, पट्टा पद्धत, एस आर टी व ईतर पद्धतीने भात लागवड केली जाते. गेल्या दोन तीन दिवसापासून मावळात रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी भात लावणीला सुरुवात केली आहे.

  हे ही वाचा : कोण होणार भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस

  सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले भुशी डॅम ओव्हर फ्लो होताच पर्यटक मोठी गर्दी करतात. भुषी डॅम परिसरात असणाऱ्या टायगर पॉईंट, ईको पॉईंट या स्थळावरही पर्यटक भेट देतात. महत्वाचे म्हणजे सगळ्या परिसरात धुक्याची चादर पसरलेली असते. सह्याद्रीच्या पर्वत रांगा बघण्यासाठी देखील अनेक पर्यटक हजेरी लावतात. लहान-मोठे धबधबे आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करत असते. 

  पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाचा माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे. आठवडाभार पावसाचा जोर कायम असेल असा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. पुण्याजवळील घाट परिसरात आणि धरण परिसरात संततधार पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. 

  हे ही वाचा : Kaali पोस्टरला दणका; भारताच्या विनंतीवर ट्विटरची कारवाई, पोस्टर हटवले

  भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आज (६ जुलै) ते 9 जुलै या कालावधीत मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी अत्यंत मुसळधार पावसासह जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Pune, Pune (City/Town/Village)

  पुढील बातम्या