Home /News /mumbai /

शपथपत्र लिहून देणारे शाखाप्रमुख शिंदे गटाकडे निघाले, शिवसेनेची भिंतही कोसळली!

शपथपत्र लिहून देणारे शाखाप्रमुख शिंदे गटाकडे निघाले, शिवसेनेची भिंतही कोसळली!

काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याच शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेतली होती.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याच शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेतली होती.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याच शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेतली होती.

मुंबई, 06 जुलै : शिवसेनेत बंड पुकारून एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये येण्यासाठी शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी रांग लावली आहे. पण, दुसरीकडे आता शाखाप्रमुख (shivsena shakha pramukh) सुद्धा शिंदे गटात सामील होण्यासाठी निघाले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या बंडानंतर आता मुंबईतले शाखाप्रमुख त्याच मार्गावर चाललेत का? असा प्रश्न उपस्थितीत व्हावा अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. आज एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या  मागाठणे मतदारसंघातील शाखाप्रमुख आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे स्थानिक विभाग प्रमुखांकडे दिले आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सोबत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याच शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेतली होती. त्याला दहा दिवसही होत नाही तोच. त्याच शिवसैनिकांनी राजीनामा सत्र सुरू केलंय. आज मागाठणे विधानसभा मतदार संघात आमदार प्रकाश सुर्वे यांची जल्लोषात मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत हे सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी होणार असलेल्याचीही माहिती मिळत आहे.   शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर जोरदार टीका दरम्यान, शंभूराज देसाई बऱ्याच दिवसानंतर सातारा जिल्ह्यातील आपल्या मतदार संघात आल्यावर पत्रकार परिषद घेत झालेल्या घटनेचा वृत्तांत दिला. ते म्हणाले आम्ही गद्दार नाही 15 लोकांची शिवसेना (shiv sena rebel) की  41लोकांची हे त्यांनी ठरवावे असे म्हणत देसाईंनी ठाकरे घराण्यावर टीका केली. शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली 'आम्ही शिवसेना सोडली नाही आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले आहे. त्यांनी जी काही अडिच वर्षे बडबड केली त्याला कोणीही महत्व देणार नाही. ज्या संजय राऊतामुळे हे सगळ झालं त्याला महत्व देत नसल्याचे देसाई म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या