मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शिवसेनेनं कसली कंबर, मुंबईतील शाखा होणार हायटेक, आदित्य ठाकरेंनी दिली नवी आयडिया!

शिवसेनेनं कसली कंबर, मुंबईतील शाखा होणार हायटेक, आदित्य ठाकरेंनी दिली नवी आयडिया!

'आता आपल्याला शाखा ई-शाखा करण्याची वेळ आली आहे. लोकं तर आपल्याकडे येतीलंच मात्र आता आपण त्यांच्या पर्यंत पोहचण्याची वेळ आली आहे'

'आता आपल्याला शाखा ई-शाखा करण्याची वेळ आली आहे. लोकं तर आपल्याकडे येतीलंच मात्र आता आपण त्यांच्या पर्यंत पोहचण्याची वेळ आली आहे'

'आता आपल्याला शाखा ई-शाखा करण्याची वेळ आली आहे. लोकं तर आपल्याकडे येतीलंच मात्र आता आपण त्यांच्या पर्यंत पोहचण्याची वेळ आली आहे'

मुंबई, 20 ऑक्टोबर : मुंबई महापालिका निवडणुकीचे (mumbai election) वारे आतापासूनच वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेनंही (shivsena) कंबर कसली असून मुंबई कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखांना (shivsena shakha) हायटेक करण्याचा सल्ला दिला आहे.

शिवसेनाप्रमुख युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दिंडोशीतल्या गोकुळधाम सोसायटीतल्या 52 क्रमांकाच्या नूतनीकरण केलेल्या शिवसेना शाखेचं उद्धघाटन सोहळा पार पडला. यावेळी स्थानिक आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शिवसेनेच्या शाखेबद्दल माहिती दिली.

यानंतर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मुंबई महापालिकेच्या सर्व सेवा व्हॉटस्अप उपलब्ध करण्याची घोषणा करतानाच शिवसेनेच्या शाखा ऑनलाईन करण्याची गरज आहे.  ज्येष्ठ शिवसैनिकांना,  युवा सैनिकांना शाखेत बोलावून समाजकारणाचे धडे देण्याची विनंती केली.

ती बातम्या देत होती आणि मागे सुरू होतं अश्लील दृश्य; तो VIDEO पाहून प्रेक्षक शॉक

तसंच 'कोविडच्या नंतर माणसांची भेट किती होणार? आणखी किती काळ चेहऱ्यावर मास्क ठेवावा लागणार, यावर विचार सुरुच आहे. कोविडच्या काळात प्रत्येत शिवसेनेने वेगळं काम केलंय. मात्र, आता आपल्याला शाखा ई-शाखा करण्याची वेळ आली आहे. लोकं तर आपल्याकडे येतीलंच मात्र आता आपण त्यांच्या पर्यंत पोहचण्याची वेळ आली आहे' असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

'आजचा जमाना हा स्विगी, झोमॅटोचा जमाना आहे. लोकं हॉटेलमध्ये कमी जातात मात्र घरी जास्त जेवण मागवतात. त्याच धर्तीवर आपण लोकांना किती सेवा ऑनलाईन देऊ शकतो हे पहायला हवं. पुढच्या काही दिवसांत महापालिकेच्या सगळ्या सुविधा तुम्हाला घरबसल्या व्हॉट्सअप वरून घेता येतील. तसंच आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात शिवसेनेची शाखा ही ऑनलाईन कशी होईल आणि ती जनतेच्या घरात कशी पोहचेल ते आपल्याला पहावं लागणार आहे.' असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

त्या तरुणाला तुरुंगाची नाहीतर..,अमृता फडणवीसांचं आर्यन खानच्या अटकेवर विधान

विशेष म्हणजे, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. थेट खेडोपाड्यातल्या डॉक्टर,सरपंचाशी संवाद साधत महाराष्ट्र कोरोमामुक्त करण्याचा आवाहन केलं होतं. याच धर्तीवर एक पाऊल पुढे टाकत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी थेट शिवसेना शाखाच ऑनलाईन करण्याचा सल्ला नेत्यांना दिला.

First published:
top videos