मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /त्या तरुणाला तुरुंगाची नाहीतर..,अमृता फडणवीस यांचं आर्यन खानच्या अटकेवर मोठं विधान

त्या तरुणाला तुरुंगाची नाहीतर..,अमृता फडणवीस यांचं आर्यन खानच्या अटकेवर मोठं विधान

'इथं लोक ड्रग्स घेऊन फिरतात हे कारण लोकांनी दिलं आहे. यावर काम करावं की नाही करावं'

'इथं लोक ड्रग्स घेऊन फिरतात हे कारण लोकांनी दिलं आहे. यावर काम करावं की नाही करावं'

'इथं लोक ड्रग्स घेऊन फिरतात हे कारण लोकांनी दिलं आहे. यावर काम करावं की नाही करावं'

मुंबई, 20 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणी (aryan khan arrest case) भाजपचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी प्रार्थना केल्याची घटना ताजी असताना आता खुद्ध भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadanvis) यांनीही उडी घेतली आहे. 'हे ड्रग्स येते कुठून त्याचा शोध लागला पाहिजे. त्या तरुणाला तुरुंगाची नाही तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते' असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं.

आर्यन खान अटक प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी NCB ची पाठराखण करत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात आता अमृता फडणवीस यांनीही आपली नवी भूमिका मांडली.

'ड्रग्स प्रकरणांमध्ये यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझं व्यक्तिगत मग नाही. जी लोक सापडली त्यांना अटक करावी, पण असं नाही की तरुण मुलं सापडली तर त्यांना जेलमध्ये टाकावं, त्यांचं समुपदेशन करणे गरजेचं आहे. हे ड्रग्स येते कुठून त्याचा शोध लागला पाहिजे. त्या तरुणाला तुरुंगाची नाही तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते', असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

UN मध्ये चीनविरोधात बोलताना भारतीय डिप्लोमॅटचा माईक अचानक बंद, पुढे काय झालं?

'इथं लोक ड्रग्स घेऊन फिरतात हे कारण लोकांनी दिलं आहे. यावर काम करावं की नाही करावं. महाराष्ट्र हा प्रगतीच्या दृष्टीने पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल व्हावा, हे आपल्यालाच ठरवायचं आहे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

तसंच, 'यांना मस्ती आली आहे, एक माजी पोलीस आयुक्त आहे, तर दुसरीकडे माजी गृहमंत्री आहे, त्यांचे कुठे हनिमून चालले आहेत ते आपल्याला माहिती नाही. हे व्हायला नको हवे आहे. तुम्हाला कुठे जर दिसत असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे,  अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली.

मावळ गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश,अजितदादा भारावले

'सरकार लसीकरणाबाबत कायम राजकारण करतंय हे त्यांचे नेहमी सुरू राहणार आहे. सामनातून भाजपवर टीका होणार नाही तर शिवसेनेचे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच वसुली सरकार चालणार कसे, अशी टीकाही अमृता फडणवीस यांनी केली.

First published:
top videos