Home /News /mumbai /

एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या; आणखी 5 बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई?

एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या; आणखी 5 बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई?

सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 12 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. मात्र आता हा आकडा आणखी वाढला आहे.

    मुंबई 24 जून : राज्यातील राजकीय संकटादरम्यान महाविकास आघाडीचं सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 अपक्ष आमदार असल्याचा शिंदे यांचा दावा आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं आहे. अशात आता शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली. विधिमंडळ कायद्यांतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 12 आमदार कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. मात्र आता हा आकडा आणखी वाढला आहे. आता यात आणखी 5 आमदारांची भर पडली आहे. शिवसेनेकडून आणखी पाच जणांविरोधात अपात्रतेसाठी नावे देण्यात आली आहेत या पाच जणांविरोधात कारवाईची मागणी - 1) सदा सरवणकर 2) प्रकाश आबिटकर 3) संजय रायमुळकर 4) बालाजी किणीकर 5) रमेश बोरनारे मिळालेल्या माहितीनुसार, महविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांची रणनीती ठरली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत. सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे. हे गणित सतत बदलत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होणार आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र पलटवलं जाऊ शकतं
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या