मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज्याच्या राजकारणाला नवे वळण, शिवसेना UPA च्या वाटेवर, पवार करणार मध्यस्थी?

राज्याच्या राजकारणाला नवे वळण, शिवसेना UPA च्या वाटेवर, पवार करणार मध्यस्थी?

 सोनिया गांधी आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोनिया गांधी आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोनिया गांधी आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई, 14 डिसेंबर : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार (mva government) स्थापन केल्यानंतर शिवसेना (shivsena) यूपीएमध्ये (upa) सामील होणार अशी चर्चा गेल्या दिवसांपासून रंगली आहे. पण आता शिवसेना यूपीएमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या पुढाकाराने शिवसेना यूपीएमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यामध्ये जवळीक वाढली आहे. दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये बैठका झाल्या आहे. त्यामुळे शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार अशी चर्चा रंगली आहे.

पण आता शिवसेना युपीए मध्ये जाण्याचे निश्चित झाले आहे. शरद पवार यांच्या पुढाकाराने शिवसेना यूपीएमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची यूपीएमध्ये जाण्यावर चर्चा झाली आहे. 2024 लोकसभा निवडणूक शिवसेना यूपीएसोबत लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Saraswati river | सरस्वती नदी खरोखरच नामशेष झाली आहे का? काय आहे तथ्य?

सोनिया गांधी आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळणार आहे.

विराट-रोहितमुळे BCCI हैराण! भारताला मिळणार तिसराच कॅप्टन? हा खेळाडू रेसमध्ये

काही दिवसांपूर्वीच  संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. राहुल गांधी आणि राऊत यांच्या भेटीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. कारण राज्यातील आगामी महापालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर विधानसभा आणि पुढे लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट मानली जात होती. शिवसेना युपीएत सामील होणार का? भाजपविरोधात (BJP) देशभरात जी आघाडी निर्माण होईल त्या आघाडीत शिवसेना असणार का? त्या आघाडीत तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC) असणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. यूपीएमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप झाला नाही, हा भविष्यातला प्लॅन आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.

First published: