मुंबई, 14 डिसेंबर : आपला देश विविधतेने नटलेला आहे, असे म्हणतात ते काही खोटं नाही. इथे भाषेपासून राहण्यापर्यंत आणि खाण्यापासून पेहरावापर्यंत सगळ्याच गोष्टीत वेगळेपण पहायला मिळते. देशात दिसणारी भौगोलिक परिस्थिती क्वचितच इतर ठिकाणी पहायला मिळत असेल. डोंगररांगा आणि पर्वतच नाही तर अनेक नद्यांचा संगम आपल्याला अचंबित करतो. गंगा आणि यमुना नद्यांच्या उगमासह सरस्वतीसारखी पौराणिक नदी देखील इथं वाहते. शतकानुशतके आपल्या देशात अनेक संस्कृती जन्मल्या आणि लोप पावल्या. मात्र, नद्या सर्वांच्या कल्याणासाठी अव्याहतपणे आपलं पाणीच देत आहेत. अशा नद्यांपैकी एक म्हणजे सरस्वती, जी कुठेतरी नामशेष झाली असावी किंवा इतर नदीमध्ये एकरुप झाली असावी. चला जाणून घेऊया सरस्वती नदीशी संबंधित काही रंजक गोष्टी. पुराणात सरस्वती नदीला विशेष स्थान मिळालं आहे. या नदीची देवीप्रमाणे पूजा केली जाते. ही नदी आजही वाहत असल्याचे पुराणात सांगितले आहे. पण आज ही नदी कोणालाच दिसत नाही आणि विज्ञानानुसार शेकडो वर्षांपूर्वी ती पृथ्वीवर होती. मात्र, आज ही नदी नामशेष झाली आहे. त्यामुळे ही नदी आता दिसत नाही. शास्त्रानुसार सरस्वती नदी एका शापामुळे नामशेष झाली आणि ती आता दिसत नाही. त्याचवेळी दुसऱ्या एका कथेनुसार या नदीला मिळालेल्या वरदानामुळे ती नामशेष होऊनही अस्तित्वात आहे. याच वरदानामुळे प्रयागमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती यांचे मिलन मानले जाते, तर सरस्वती नदी कधीच कुणाला दिसत नाही. तरीही तिचे अस्तित्व कायम आहे. कुठे होतो उगम? महाभारतात सापडलेल्या वर्णनानुसार, सरस्वती नदीचा उगम हरियाणात यमुनानगरच्या थोडं वर आणि शिवालिक डोंगराच्या खाली असलेल्या आदि बद्री नावाच्या ठिकाणाहून झाला आहे. आजही लोक या ठिकाणाला तीर्थक्षेत्र मानून तेथे जातात. पण आज आदि बद्री नावाच्या ठिकाणाहून वाहणारी नदी फार दूर जात नाही, पातळ ओढ्यासारखी, ठिकाणाहून दिसणारी ही नदी, लोक तिला सरस्वती नदी मानून तिची पूजा करतात. वैदिक आणि महाभारत काळातील वर्णनानुसार ब्रह्मावर्त हे नदीच्या काठावर होते. मात्र, आज तिथे काही जलाशय आहेत. आजही कुरुक्षेत्रातील ब्रह्मसरोवर किंवा पेहवा येथे अशी अर्धचंद्राच्या आकाराची सरोवरे दिसतात, पण तीही कोरडी पडली आहेत. भारतीय पुरातत्व परिषदेच्या मते, सरस्वतीचा उगम उत्तरांचलमधील रुपन नावाच्या हिमनदीतून झाला. रुपन ग्लेशियरला आता सरस्वती ग्लेशियर असेही म्हणतात. अजूनही अस्तित्वात आहे का? अनेक वैज्ञानिक शोधांवरून असे दिसून येते की सरस्वती नदीच्या आजूबाजूच्या ठिकाणी भूकंप झाल्याने जमिनीखालचे पर्वत वर आले आणि सरस्वती नदीचे पाणी मागे गेले. द्रष्टावती नदीचे वर्णनही वैदिक काळात येते. ती सरस्वती नदीची उपनदी होती. ती हरियाणातून वाहत होती. जेव्हा तीव्र भूकंप झाला आणि हरियाणा आणि राजस्थानमध्ये पर्वत वर आले तेव्हा नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलली. त्यावेळी सरस्वती नदीची उपनदी असलेली दृषद्वती नदी उत्तरेकडे व पूर्वेकडे वाहू लागली.
औरंगजेब ते अहिल्याबाई होळकर, काशी विश्वनाथ मंदिर उभारणी आणि विध्वंसाची कहाणी
या दृषद्वतीला आता यमुना नदी म्हणतात, तिचा इतिहास 4,000 वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. यमुना नदी ही पूर्वी चंबळची उपनदी होती. भूकंपामुळे जमीन वर आल्यावर सरस्वतीचे पाणी यमुनेत आले आणि सरस्वती नदी यमुनेला जाऊन मिळाली. प्रयागला तीन नद्यांचा संगम मानला जातो. कारण सरस्वती नदी आजही तिथे गुप्तपणे वाहते, असे मानले जाते. तर शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ही नदी नामशेष झाली असून ही नदी प्रयागराजपर्यंत पोहोचली नाही. संशोधन काय सांगते? सरस्वती नदीच्या अस्तित्वाविषयी सांगायचे तर वेगवेगळ्या संशोधनांवरून असे दिसून येते की तिचे अस्तित्व सर्व धर्मग्रंथ, पौराणिक कथा आणि विज्ञानाने मान्य केलं आहे. एका संशोधनात असे म्हटले आहे की सुमारे 5,500 वर्षांपूर्वी, सरस्वती नदी भारताच्या हिमालयातून उगम पावली आणि हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये सुमारे 1,600 किमी वाहत गेली आणि शेवटी अरबी समुद्रात विलीन झाली. इतर पवित्र नद्यांप्रमाणे आजही सरस्वती नदीचे अस्तित्व नाकारता येत नाही. जेव्हा पवित्र नद्यांचा विचार केला जातो तेव्हा गंगा आणि यमुनेसह सरस्वतीचीही पूजा केली जाते.