मुंबई, 13 नोव्हेंबर : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने स्वातंत्र्याविषयी केलेल्या विधानानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही (Shiv Sena mouthpiece Saamana) आता कंगनावर निशाणा साधण्यात आला आहे. सामना संपादकीयमध्ये म्हटलं, शिवसेनेने राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण टेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करत असतात. महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो. पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सकळ्यांवरच अफू-गांचाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिगकारी ठरवले आहे. कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य बाकी सगळे झूठ. कंगनाबेनचे डोके बधीर सामना संपादकीयमध्ये पुढे म्हटलंय, कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील. पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील. वीरांचा, स्वातंत्र्याचा अपमान देश कधीच सहन करणार नाही. वाचा : कंगुबाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अमोल मिटकरींनी घेतला कंगनाशी पंगा भाजपच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली भाजपतील पुरुष महामंडळ अधूनमधून बॉम्ब फोडण्याची भाषा करीत असतात. प्रत्यक्षात बॉम्ब कधीच फुटत नाहीत. पण भाजपच्याच कंगनाबेन रनौत यांनी एक बॉम्ब फोडला असून त्यामुळे भाजपच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली आहे असंही सामानात म्हटलं आहे. कंगनाला सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणं दुर्दैव सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलं, कंगनाबेन यांनी जाहीर केले, 1947 साली हिंदुस्थानला स्वातंत्रय मिळाले नाही तर भीक मिळाली. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 सालात मिळाले (म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यावर). कंगनाबेनच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाबेन यांना नुकतेच पद्मश्री या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. यापूर्वी हा सन्मान हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या वीरांना मिळाला आहे. त्याच वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हे देशाचे दुर्दैव आहे. वाचा : कंगना रणौतवर वरुण गांधी यांनी साधला निशाणा; अभिनेत्री म्हणाली, ‘…जा आणखी रडा आता’ कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला. तिचे नथुरामप्रेमही उफाळून येत असते. तिच्या बरळण्याकडे एरव्ही कोणी फारसे लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरे ठरते. 1947 साली स्वातंत्रय मिळालेच नाही तर भीक मिळाली. पण या भीक मागण्याच्या प्रक्रियेत कंगनाचे सध्याचे राजकीय पूर्वज कोठेच नव्हते असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







