मुंबई, 21 सप्टेंबर : हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासह चंदक्रांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही सोमवारी पत्रकार परिषद घेत कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल म्हणत हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन आता शिवसेनेने सामनाच्या संपादकीयच्या (Saamana editorial) माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून? ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे आणि तसे धमकीसत्र त्यांनी चालवले आहेच. काही झाले की, हे लोक फक्त ईडी, सीबीआयच्या नावाने धमक्या देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरच्या हसन मुश्रीफ यांनाही धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. चंद्रकांत पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता हसन मुश्रीफ हे मंत्री आहेत आणि कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला आणि चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळवताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता असं म्हणत शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. …त्या FIR मध्ये अजित पवारांचं नाव, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही ईडी सोबत लढताना तोंडाला फेस येईल असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अंहकार आहे. आमची वर सत्ता आहे, आम्ही काहीही करु शकतो अशी भाषा पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करु” ही त्यांची नियत आहे आणि महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. ईडीमुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय ते नंतर पाहू ‘ईडी’शी लढताना तोंडास फेस येईल असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. ‘ईडी’मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे. ‘कुण्या राजाची तू गं राणी’ अमोल मिटकरींचा गाण्यातून चंद्रकांत पाटलांना टोला, VIDEO जनतेच्या जिवाशी खेळायचं आहे का? मुंबई लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा अतिरेक्यांचा कट होता. पोलीस त्या तपासात गुंतले असतानाच विरोधी पक्ष राज्यात भलतेच प्रश्न निर्माण करुन पोलिसांवरील ताण वाढवीत आहे. विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेही जनजीवन विस्कळीत होऊ शकेल. विरोधकांना राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे का? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलं आहे की, चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपचे लक्तरेच लोंबत असतात. एकतर ते ‘ईडी’, ‘सीबीआय’ सारख्या संस्थांना बदनाम करत आहेत. या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल असे त्यांचे वर्तन आहे. दुसरे एक गंभीर विधान पाटलांनी केले. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचे सुद्धा क्सिल नाही. पाटील म्हणतात तसे हे स्किल माजी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे व याबाबतची पीएचडी त्यांनी केली असावी. त्यामुळे ईडीने पाटील व इतर माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब एकदा घ्यायला हवा आणि आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडाला फेस आणायला हवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.