• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ...त्या FIR मध्ये अजित पवारांचं नाव, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

...त्या FIR मध्ये अजित पवारांचं नाव, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहे. अजित पवार यांच्यासारखे 100 नेते खिश्यात घेऊन फिरतात. त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे नाही

देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहे. अजित पवार यांच्यासारखे 100 नेते खिश्यात घेऊन फिरतात. त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे नाही

'देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहे. अजित पवार यांच्यासारखे 100 नेते खिश्यात घेऊन फिरतात. त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे नाही'

 • Share this:
  मुंबई, 20 सप्टेंबर : 'भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे असे दबंग नेते आहे, ते अजित पवारांसारख्या (ajit pawar) शंभर जणांना खिश्यात घेऊन फिरतात', असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी अजित पवारांना चांगलेच डिवचले आहे. तसंच, 'अजित पवारांचं प्रकरण सुरू आहे, त्यांचं नाव एफआयआरमध्ये आहे, असाही दावाही त्यांनी केला. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्यांना अटकाव केल्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. किरीट सोमय्यांना सांगितलं आहे की, 'राडेबाजी झालेलं प्रकरण हे राज्य सरकार आहे. त्यावर त्यांना काही कारवाई करायची असेल तर ते करू शकता. पण अजित पवार यांचं प्रकरण सध्या सुरू आहे. फायनल एफआयआर तयार झाला आहे, त्यात अजित पवार यांचे नाव आहे, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला. आहारात Vitamin D च्या समावेशामुळे कमी होत आहे कोरोनाचा धोका? तसंच, देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहे. अजित पवार यांच्यासारखे 100 नेते खिश्यात घेऊन फिरतात. त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे नाही, आज काय झालं तर उद्या काही कळणार नाही. फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका. पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. त्यांना शिवसेनेनं खूप त्रास दिला. पण, तरीही त्यांनी पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, पहाटेच्यावेळी अजित पवारांसोबत शपथ घेणे हे जरा रिस्कीचं होतं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत - फडणवीस दरम्यान,  देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईवरही प्रतिक्रिया दिली आहे. 'हसन मुश्रीफांनी दावा केला की, भाजपमध्ये येण्याची मला ऑफर देण्यात आली होती. मी गेलो नाही म्हणून मला टार्गेट केलं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, कोणी दिली मुश्रीफांना ऑफर? आम्ही असं ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला'
  Published by:sachin Salve
  First published: