मुंबई, 20 सप्टेंबर : ‘100 अजित पवार (ajit pawar) खिश्यात बाळगल्याची भाषा तुम्ही काय करताय, तुमच्या सहित 105 आमदार अजितदादांनी तेव्हाच गुंडाळले ज्यादिवशी राष्ट्रपती राजवट उठवली’ असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil ) यांना सणसणीत टोला लगावला. तसंच, ‘कुण्या गावाची गं तू राणी’ असं म्हणत चांगलाच खोचक टोलाही लगावला. भाजपचे खासदार किरीट सोमय्यांना केलेल्या आरोपांची पाठराखण करत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टिकेला अमोल मिटकरी यांनी आपल्या शैलीत समाचार घेत पाटील यांना चांगलंच फटकारून काढलं.
अमोल मिटकरी यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका pic.twitter.com/Ji6uAFuESk
— News18Lokmat (@News18lokmat) September 20, 2021
‘अहो, चंद्रकांत पाटील अख्या भारताला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माहीत आहे की अजितदादा काय आहेत? तुम्ही काय 100 अजित पवार खिश्यात बाळगल्याची भाषा तुम्ही काय करताय, तुमच्या सहित 105 आमदार अजितदादांनी तेव्हाच गुंडाळले ज्यादिवशी राष्ट्रपती राजवट उठवली’ असा टोला मिटकरींनी पाटील यांना लगावला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 40,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज तसंच, तुम्ही सुद्धा स्वतंत्र्य मतदारसंघ शोधत एका प्रामाणिक महिलेला बळी घेतला. कोल्हापूर चप्पल दाखवल्यामुळे तिथून पळावं लागलं, आता पुणेरी मिसळ खायची असेल तर तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस यांनी नांदाला लागावं, असंही मिटकरी म्हणाले. तसंच, तुम्हाला बघून मला पिंजरा चित्रपटातील गाणं आठवत ‘कुण्या गावाची गं, कुण्या राजाची तू गं राणी’ असं गाण म्हणत अजितदादांचा नाद करू नका, असा सल्लावजा टोलाच मिटकरींनी पाटील यांना लगावला. गर्भनिरोधक गोळ्या-नसबंदीनंतरही महिला पुन्हा पुन्हा होते प्रेग्नंट; डॉक्टरही शॉक तर दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांनीही चंद्रकांत पाटलांवर टीकेचा आसुड ओढला. ‘चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्न आहे, त्यांच्या करमणूकपर राजकीय विधानांवर मविआ सरकारने करमणूक कर लावला पाहिजे, अशी टोमणा रूपाली चाकणकर यांनी लगावला.