शरद पवार यांन मुंबईत आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेसोबत सत्ता प्रस्थापित करण्यावर महत्त्वाचे भाष्य केले. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही पवारांनी सरकारची कानउघडणी केली.
पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांचे लक्ष वेधत पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे असे सांगत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये असा सल्ला दिला.
तसेच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी असेही सांगितले.
सरकारबाबत प्रश्न विचारला असता, भाजप-सेनेनं लवकराच लवकर सत्ता स्थापन करावे असे सांगत गौप्यस्फोट केला.
सकाळी संजय राऊत आणि पवारांच्या भेटीनंतरही पवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बसणार, आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू असे विधान केले.
तर, राऊत-पवार भेटीनं खळबळ माजली असताना, संजय राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते असे स्पष्ट केले.
तसेच, जनतेने युतीला कल दिला, त्यांनीच सरकार बनवावं. 25 वर्ष युतीत सडले तरी एकत्र लढले. आमच्याकडे संख्याबळ असते तर सरकार बनवलं असतं, असा खुलासा पवारांनी केला.
शरद पवार यांनी, राज्यसभेच्या अधिवेशनासंदर्भात राऊत यांच्याशी चर्चा केली असेही त्यांनी सांगितले.
तसेच, भाजप-सेनेनं मिळून सरकार स्थापन करून अस्थैर्य दूर करावे, असेही सांगितले. तसेच, चार वेळा मुख्यमंत्री झालोय,आता तशी अजिबात इच्छा नाही असेही स्पष्ट केले.
तर, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही. ही फक्त शिवसेनेला दाखवलेली भिती आहे. असेही पवारांनी यावेळी सांगितले.

)







