महाराष्ट्रात 48 तासांत नवं सरकार.. शिवसेनेच्या मनधरणीचे फडणवीसांचे जोरदार प्रयत्न

शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी भाजपनं प्लॅन बी तयार केला आहे

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 09:15 AM IST

महाराष्ट्रात 48 तासांत नवं सरकार.. शिवसेनेच्या मनधरणीचे फडणवीसांचे जोरदार प्रयत्न

प्रशांत लीला रामदास,(प्रतिनिधी)

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर: महाराष्ट्रात येत्या 48 तासांत नवं सरकार अस्तित्वात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी 'News 18 लोकमत' दिली आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या मनधरणीचे देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन होईल आणि राजकीय पेच लवकरच सुटेल असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. राज्यात सरकार लवकर स्थापन करण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात आज, बुधवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. आता बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस आणि भागवत यांच्यात बंद दाराआड खलबतं

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीत नितीन गडकरी यांचं नाव समोर आले. गडकरींच्या नावाची चर्चा होऊ शकते, अशी सूत्रांनी माहिती दिली. पण भाजपकडून या बातमीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

शिवसेना आणि भाजपमध्ये वाद आता चांगलाच पेटला आहे. सत्तेचा हा वाद सरसंघचालकांच्या दारात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आणि बंद दाराआड चर्चा केली. जवळपास 1 तास ही चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत भैय्याजी जोशीही सोबत होते.

Loading...

या बैठकीत नितीन गडकरी यांचं नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे फडणवीस यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यामुळे नितीन गडकरी यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपचा प्लॅन बी?

दरम्यान, त्याआधी दिल्लीतून परत आल्यानंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर भाजपने मुख्यमंत्री फडणवीसच होणार हे स्पष्टपणे बजावले आहे. तसंच सेनेला जेरीस आणण्यासाठी भाजपनं प्लॅन बी तयार केला आहे.त्यानुसार 2014 प्रमाणेच शपथविधी उरकून नंतर सेनेची कोंडी करण्याची तयारी भाजप करत असल्याचं समजते.

शपथविधीचा छोटेखानी समारंभ लवकरच होईल, असं भाजप नेते सांगत आहे. त्यासाठी काही आमदार गैरहजर राहतील यांची खबरदारी घेत विधिमंडळात बहुमताचा आकडाच खाली आणण्याचा करण्याचा डाव भाजप टाकू शकतो. चर्चेसाठी सेनेच्या प्रस्तावाची वाट बघत असल्याचं सागून भाजपनं चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात टोलवला.

इकडे दररोज पत्रकार परिषदा घेऊन संजय राऊत सेनेची भूमिका आक्रमकपणे मांडत आहेत. सत्तेत समसमान वाटा, अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद हा सेनेचा हट्ट कायम आहे. पण सेनेच्या या आक्रमक भूमिकेला तितकंच आक्रमक उत्तर देण्याची तयारी भाजपनं केल्याचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत सेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर भाजप ठाम आहे. सेनाच जनमताचा अनादर करत नसल्याचा आरोप भाजपने केला.

VIDEO:आठवलेंनी घेतली नितीन गडकरींची भेट, केली 'ही' मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 08:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...