या तरुणीने मोडलं फडणवीसांचं रेकॉर्ड; 21 व्या वर्षीच झाली देशातली सर्वांत तरुण महापौर

या तरुणीने मोडलं फडणवीसांचं रेकॉर्ड; 21 व्या वर्षीच झाली देशातली सर्वांत तरुण महापौर

केरळच्या (Thiruvanantpuram) एका तरुणीने फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यानंतरच्या इतर तरुण महापौरांवर (Youngest mayor in India) मात करत 21 व्या वर्षीच महापौर पद (Mayor) मिळवण्याचा विक्रम केला आहे.

  • Share this:

मीरा मनू

थिरुवनंतपुरम, 25 डिसेंबर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम होता. फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूर महापालिकेचे नगरसेवक 21 व्या वर्षीच झाले होते आणि तेही एक रेकॉर्डच होतं. आता मात्र केरळच्या (Thiruvananthapuram) एका तरुणीने फडणवीस आणि त्यानंतरच्या इतर तरुण महापौरांवर मात करत 21 व्या वर्षीच मेयर पद (Youngest mayor in India) मिळवण्याचा विक्रम केला आहे.

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. या शहराच्या महापालिकेच्या महापौर म्हणून आर्या राजेंद्रन (Arya Rajendran) यांची निवड झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या  CPI (M)सदस्य असलेल्या आर्या राजेंद्रन देशातल्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण मेयर ठरल्या आहेत.

आर्या राजेंद्रन यांचं तिरुवनंतपुरमच्या LBS कॉलेजमध्ये शिक्षण सुरू आहे. त्या तिथून BSc पदवीसाठी अभ्यास करत आहेत. पण ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच त्या शहराच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. आर्या गणिताच्या विद्यार्थिनी आहेत.

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)या विद्यार्थी संघटनेत आर्या कार्यरत होत्या. SFI च्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. आर्या यांनी महापालिकेची निवडणूक (Local Body Polls in 2020) पहिल्यांदाच लढवली. CPIM च्या जिल्हा सचिवालयानेच त्यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती. थिरुवनंतपुरमच्या मुदवनमुगल (Mudavanmugal)वॉर्डातून त्या निवडून आल्या. एवढ्या लहान वयात नगरसेवक होण्याची संधी त्यांना मिळाली. पण त्याहून मोठा मान त्यांना शुक्रवारी मिळाला, जेव्हा त्यांची महापौरपदासाठी निवड झाली.

महाराष्ट्रात हा मान देवेंद्र फडणवीस यांना 1997 साली मिळाला होता. नागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर म्हणून त्यांची निवड झाली होती. त्या वेळी फडणवीस यांचं वय 27 वर्षं होतं. त्याअगोदर आर्या राजेंद्रन यांच्याप्रमाणेच वयाच्या 21 व्या वर्षी ते नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले होते.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: December 25, 2020, 4:05 PM IST

ताज्या बातम्या