मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /VIDEO: घरगुती वादातून शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला, भांडणात भाजप आमदाराची एन्ट्री

VIDEO: घरगुती वादातून शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला, भांडणात भाजप आमदाराची एन्ट्री

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल (Viral video) होत आहे. ज्यामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी आपल्या सूनेच्या तोंडावर थुंकत (Eknath patl spit on daughter in law) असल्याचं दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल (Viral video) होत आहे. ज्यामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी आपल्या सूनेच्या तोंडावर थुंकत (Eknath patl spit on daughter in law) असल्याचं दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल (Viral video) होत आहे. ज्यामध्ये शिवसेनेचा पदाधिकारी आपल्या सूनेच्या तोंडावर थुंकत (Eknath patl spit on daughter in law) असल्याचं दिसत आहे.

कल्याण, 30 मे: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल (Viral video) होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती एका महिल्याच्या तोंडावर थुंकताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओमधील व्यक्ती शिवसेनेचा पदाधिकारी असून तो आपल्या सूनेच्या तोंडावर थुंकत (Eknath patl spit on daughter in law) असल्याचं दिसत आहे. याप्रकरणी सुनेनं आपल्या सासऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका प्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक एकनाथ पाटील (Eknath Patil) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पण हा दावा खोटा असल्याच पाटील यांनी सांगितलं आहे.

संबंधित व्हिडीओ खूप जुना असून हे भाजप पदाधिकाऱ्यांचं माझ्याविरुद्ध रचलेलं कटकारस्थान असल्याचं शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपकडून केल्या जाणाऱ्या आरोपत काहीही तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण पीडित सूनेनं भाजप आमदराकडे मदत मागितल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आलं आहे. आता सून आणि सासऱ्याच्या या घरगुती वादात भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी उडी घेतली असून आरोपी सासऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील हे कल्याण ग्रामीण परिसरातील भोपर गावात राहतात. तर हर्षदा पाटील या त्यांच्या सूनबाई आहेत. एकनाथ पाटील हे आपल्याला नेहमी मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचं हर्षदा पाटील यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी स्थानिक वरीष्ठ शिवसेना पदाधिकाऱ्यांना सासऱ्याची तक्रार केली असता, संबंधित पदाधिकारी एकनाथ पाटील यांच्या विरोधात जायला तयार नसल्याचंही हर्षदा यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही  गुन्हा दाखल करून घेतला नाही, त्यामुळे आपण मदतीसाठी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे गेली असल्याची हर्षदा यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा-चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपींनी पीडितेच्या मित्राला ठेवलं बांधून

माझा माझ्या सूनेशी काहीही वाद नाही. संबंधित व्हिडीओ जुना असून माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. याप्रकरणात मला भाजपकडून गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही एकनाथ पाटील यांनी केला आहे.

First published:

Tags: BJP, Crime news, Kalyan, Shivsena, Viral video.