Home /News /crime /

चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, आरोपींनी पीडितेच्या मित्रासमोरच केलं घृणास्पद कृत्य

चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, आरोपींनी पीडितेच्या मित्रासमोरच केलं घृणास्पद कृत्य

सामूहिक बलात्काराची (Gang Rape) आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

    ढाका 30 मे : सामूहिक बलात्काराची (Gang Rape) आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बांग्लादेशच्या (Bangladesh) ढाकामधील सावर परिसरातील आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना गेल्या शुक्रवारी रात्री आशुलिया मवेशी बाजारात घडली. या घटनेनंतर लगेचच तरुणीनं आशुलिया ठाण्यात तक्रार दाखल केली. अटक करण्यात आलेला सर्व आरोपी बसचालक असल्याचं समोर आलं आहे. आर्यन, शाजू, सुमोन मियां, मुनव्वर, शोहाग आणि सैफुल इस्लाम अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. हे सर्वजण तुरागच्या कामरपाडा येथील रहिवासी आहेत. पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडिता माणिकगंजमधील आपल्या बहिणीच्या घरुन नारायणगंज येथील आपल्या घरी जाण्यास निघाली होती. दुसरी बस पकडण्यासाठी ती शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नबीनगर बस स्टॅण्डवर पोहोचली. यादरम्यान तिची भेट ओळखीच्याच नजमुलसोबत झाली. आशुलिया ठाण्याचे अधिकारी जियाउल इस्लाम यांनी सांगितलं, की लोक दुसऱ्या बसची वाट पाहात असतानाच तिथे एक बस पोहोचली. या बसमध्ये सुमोन, मुनव्वर आणि सैफुल होते. त्यांनी म्हटलं,की टोंगी स्टेशन रोडपर्यंत 35 टक्के भाडं घेणार. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि नजमुल बसमध्ये चढले. मात्र, आरोपींना इतर प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातच बसमधून खाली उतरवलं. यानंतर आरोपीनं तरुणी आणि नजमुलला बांधून ठेवत बस पुन्हा नबीनगरकडे घेऊन गेले. यावेळी सहा आरोपींनी बसमध्येच तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. शेजारुनच जात असलेल्या पोलिसांनी मदतीसाठी आवाज देत असलेल्या नजमुलचा आवाज ऐकला. यानंतर पोलिसांनी बस थांबवली आणि सहा आऱोपींना अटक केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Gang Rape

    पुढील बातम्या