मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सदाभाऊ आणि पडळकरांनी धरले लोकांना वेठीस, वेळ आल्यावर त्यांनाही बघू - अनिल परब

सदाभाऊ आणि पडळकरांनी धरले लोकांना वेठीस, वेळ आल्यावर त्यांनाही बघू - अनिल परब

'सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर दोघेही संप भडकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे एसटी आणखी खड्ड्यात जाईल'

'सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर दोघेही संप भडकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे एसटी आणखी खड्ड्यात जाईल'

'सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर दोघेही संप भडकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे एसटी आणखी खड्ड्यात जाईल'

मुंबई, 12 नोव्हेंबर : एसटी महामंडळ (st bus workers strike) कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी आंदोलनात घुसल्यामुळे वाद पेटला आहे. सदाभाऊ खोत (sadabhau khot) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावले आहे, त्यांनीच लोकांनाही ऐन दिवाळीत वेठीस धरले आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू, असा इशाराच शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आजही तोडगा निघाला नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधून पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले आहे.

माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर येण्याची तयारी कर्मचारी दाखवत आहेत. त्यांना संरक्षणाची हमी दिली आहे.  विलिनीकरण्याच्या मागणीबाबत त्यांनी समितीसमोर जावं. कामगारांनी कामावर जावे. राजकीय पक्ष पोळी भाजून बाहेर जातील पण नुकसान तुमचे होईल.

हायकोर्टाने विचार करून 12 आठवड्यांचा कालावधी दिला आहे, तो आम्ही नाही दिला. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचे कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असं आवाहन परब यांनी केलं.

कतरिना कैफसोबत लग्नाच्या चर्चेदरम्यान, विकी कौशलनं केला आपल्या आवडत्या मुलीचा...

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर दोघेही संप भडकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे एसटी आणखी खड्ड्यात जाईल, असे वागू नका पगारवाढी संदर्भातील बोलणी सुरू होतील, तेव्हा पगार वाढवण्यासंदर्भात बोलावे, सदाभाऊ खोत आंदोलन भरकटवू नका. त्या माझ्या भगिनी आहेत. त्यांनीही विचार करावा की त्यांचे यात नुकसान आहे, असंही परब म्हणाले.

'मी आझाद मैदानात जाईन. पण त्यांनी अडेलतट्टू भूमिका घेतली तर मग काय ? मी हायकोर्टाच्या निर्णयानुसार काम करेन. माझ्यावर टीका करा, पण कामगारांचे नुकसान करू नका. हे कामगारांच्या पाठिशी उभे राहणार नाहीत. नितेश राणे कोण? त्याला आम्ही मोजत नाही, किंमत देत नाही, असा टोलाही परब यांनी नितेश राणेंना लगावला.

क्रिप्टोकरन्सीमध्ये एका दिवसात डोळे दिपवून टाकणारी वाढ,गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

मुख्यमंत्र्यांवर मुख्य प्रश्नापासून लक्ष्य टाळण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करताय, पण ते सिद्ध करा आंदोलन वेगळ्या दिशेने नेले जातंय. त्यांनाही कळलंय की हे आंदोलन चुकीचे आहे. कामावर कामगार आले नाहीत तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, जे कामगार येतील त्यांना संरक्षण देवू, असा इशाराही परब यांनी दिला.

First published:
top videos

    Tags: Gopichand padalkar, Sadabhau khot