जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ...अन् ठाकरे गटाने अखेर धनुष्यबाण चिन्ह हटवलं, नावही काढलं

...अन् ठाकरे गटाने अखेर धनुष्यबाण चिन्ह हटवलं, नावही काढलं


उद्धव ठाकरे गटाने नाव आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर आता पक्षकार्यालय आणि इतर ठिकाणावरून नाव आणि चिन्ह

उद्धव ठाकरे गटाने नाव आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर आता पक्षकार्यालय आणि इतर ठिकाणावरून नाव आणि चिन्ह

उद्धव ठाकरे गटाने नाव आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर आता पक्षकार्यालय आणि इतर ठिकाणावरून नाव आणि चिन्ह

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटामध्ये कमालीची अस्वस्था पसरली आहे. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने आता आपल्या ट्वीटर अकाऊंट आणि वेबसाईटवरून धनुष्यबाण चिन्ह हटवलं आहे. उद्धव ठाकरे गटाने नाव आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर आता पक्षकार्यालय आणि इतर ठिकाणावरून नाव आणि चिन्ह बदलण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट आणि पक्षाच्या वेबसाईटवरून धनुष्यबाण चिन्ह डिलीट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. (Shivsena : ठाकरेंसाठी किल्ला लढवणारे कपिल सिब्बल एका सुनावणीसाठी घेतात इतकी फी!) दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक, रेड टिक सगळंच निघणार आहे. उद्धव ठाकरेंबाबत सगळंच बघायला मिळणार आहे, त्यांना पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत. ‘उद्धव ठाकरेंकडे थोडी धुगधुगी शिल्लक आहे, आताचं चित्र बघून उद्धव ठाकरेंकडे कोणी राहिल, असं मला वाटत नाही, कारण आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आता उद्धवसेना राहिली आहे. पुढील काळात ठाकरेंकडे किती जण राहतात, हे बघावं लागेल. पुढच्या काही दिवसांमध्ये अजून चित्र बदलेलं पाहायला मिळेल,’ असा दावाही गिरीश महाजन यांनी केला आहे. (Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट) आमच्यासोबत निवडून येऊन युती तोडून उद्धव ठाकरे यांनी आयुष्यातील खूप मोठी चूक केली आहे, येणारा काळ उद्धव ठाकरेंसाठी अधिक बिकट राहणार असल्याचं भाकीत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. ‘उद्धव ठाकरेंकडे काही राहिलेलं नाही, त्यामुळे त्यांचा तोल जायला लागला आहे. मातोश्रीमध्ये असलेली शिवसेना खऱ्या अर्थाने जनताभिमुख झाली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आता कुणालाही शिव्या घालतील आणि न्यायायलयाच्या निर्णयानंतर पुढे काय बोलतील, याचा विचारही करू शकणार नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी वक्तव्य अपेक्षित आहेत.’ अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात