मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

एकीकडे राम मंदिराचे भूमिपूजन, दुसरीकडे अडवाणी अजूनही आरोपीच, शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

एकीकडे राम मंदिराचे भूमिपूजन, दुसरीकडे अडवाणी अजूनही आरोपीच, शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

'अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते अडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा'

'अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते अडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा'

'अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते अडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा'

  • Published by:  sachin Salve

मुंबई,  22 जुलै :  येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत श्री राम मंदिर निर्माणासाठी भूमीपूजन सोहळा होत आहे. त्यापूर्वी बाबरी कटाचा खटला बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.  'सीबीआय चालवत असलेला हा खटला 5 ऑगस्टपूर्वी बरखास्त केला तर ती श्रीराम मंदिर निर्माणासाठी आहुती देणाऱ्यांसाठी श्रद्धांजली ठरेल', असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनाला राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय गदारोळ पाहण्यास मिळत आहे. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या एनओसीची गरज नाही, असं म्हणून टीका केली आहे. त्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून 'रामायण' या शिर्षकाखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखातून भाजपवर पलटवार करण्यात आला आहे.

'मी काही ट्रम्प नाही', उद्धव ठाकरेंच्या रोखठोक मुलाखतीचा प्रोमो रिलीज

'आज विरोधाभास कसा आहे तो पहा. बाबरी तोडून जेथे राममंदिराची पायाभरणी होत आहे, त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी येत आहेत, पण बाबरी पाडल्याच्या कटाचा खटला आजही लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेकांवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिल्यावरही बाबरी विध्वंसाचा खटला सीबीआय चालवते व त्यात अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते अडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा!' असं सवाल उपस्थितीत करत भाजपला टोला लगावला आहे.

तसंच, 'बाबरी कटाचा खटलाच राममंदिर भूमिपूजनापूर्वी बरखास्त केला तर आंदोलनात शहीद झालेल्यांना ती मानवंदना ठरेल. बाबर हा आक्रमक होता हे एकदा स्वीकारल्यावर बाबरी विध्वंसाचा कट रचला, हा खटलाच गतप्राण होतो, पण रामजन्मभूमीच्या पेचात अडकलेले बाबरी विध्वंस कटाचे त्रांगडे काढायला तयार नाही.' असंही सेनेनं म्हटलं आहे.

कोरोनाच्या संकटात मुंबईला आणखी एक धोका, लहान मुलांना होतोय 'हा' आजार

'या आंदोलनाचा पाया आणि कळस उभारणारे अशोक सिंघल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाहीत. लालकृष्ण आडवाणी यांनी रामाच्या नावाने एक रथयात्रा काढली. त्या यात्रेचे सारथ्य करणारे प्रमोद महाजनही निघून गेले. रामाप्रमाणे अडवाणी वनवासात गेले. बिहारच्या वेशीवर अडवाणी यांची रथयात्रा लालू यादव यांनी अडविली व भडका उडाला. अयोध्या पेटली व कारसेवक आक्रमक झाले. याचे श्रेय शेवटी लालू यादव यांना द्यावे लागेल. ते लालू यादवही आज बंदिवान आहेत.' असा टोलाही भाजपला लगावला.

'मंदिर व्हावे असे लोकमत होते. आज ते सगळ्यात जास्त आहे, पण त्यावेळी बाबरीचे घुमट तोडले नसते तर आज रामजन्मभूमीचा परिसर मंदिरासाठी मोकळा झाला नसता व भूमिपूजनाचा दिवस कधीच उजाडला नसता. हे काम केले कोठारी बंधूंसारख्या शिवसैनिकांनी. ज्या दिवशी दुपारी बाबरी कोसळली हे स्पष्ट झाले, त्या दिवशी अनेक योद्ध्यांचे चेहरे भीतीने काळे पडल्याचे जगाने पाहिले. “हे तर आमचे कामच नव्हे. बाबरी पाडण्याचा उद्योग शिवसेनेने केला’’ असे सांगून भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी मोकळे झाले. त्यावेळी मुंबईत वीज कडाडावी तशी शिवसेनाप्रमुखांची वाणी गरजली. “होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.’’ या एका घोषणेने समस्त हिंदूंची मने व मनगटे उसळून निघाली. लोकांनी शिवसेनाप्रमुखांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून डोक्यावर घेतले. वाघाची डरकाळी म्हणजे काय ते त्याच दिवशी महाराष्ट्राने दाखवले. हा इतिहास कोणालाच नाकारता येणार नाही.' अशी आठवणही शिवसेनेनं भाजपला करून दिली.

First published:

Tags: Narendra modi