मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कोरोनाच्या संकटात मुंबईला आणखी एक धोका, लहान मुलांना होतोय 'हा' आजार

कोरोनाच्या संकटात मुंबईला आणखी एक धोका, लहान मुलांना होतोय 'हा' आजार

मार्चपासून 600 मुलांची चाचणी करण्यात आली. यापैकी 100 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यापैकी 18 मध्ये PMISची लक्षणे दिसली.

मार्चपासून 600 मुलांची चाचणी करण्यात आली. यापैकी 100 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यापैकी 18 मध्ये PMISची लक्षणे दिसली.

मार्चपासून 600 मुलांची चाचणी करण्यात आली. यापैकी 100 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यापैकी 18 मध्ये PMISची लक्षणे दिसली.

मुंबई, 22 जुलै : देशात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. यातच महाराष्ट्र राज्य कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित आहे. यातच मुंबईत आणखी एका आजाराने शिरकाव करण्यात सुरुवात केली आहे. मुंबईच्या वाडिया रुग्णायलात (Wadia Hospital) आतापर्यंत 100 कोरोना पॉझिटिव्ह मुलांना दाखल करण्यात आले आहे. यातील 18 मुलांना PMIS म्हणजेच Paediatric Multisystem Inflammatory Syndrome नावाचा आजार झाला आहे.

वाडिया रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. शकुंतला प्रभु यांच्या म्हणण्यानुसार, मार्चपासून 600 मुलांची चाचणी करण्यात आली. यापैकी 100 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यापैकी 18 मध्ये PMISची लक्षणे दिसली. ही कावासाकी सारखी लक्षणे आहेत, परंतु कावासाकी लहान मुलांमध्ये दिसून येते. तर, PMIS 10 महिन्यांपासून ते 15 वर्षांदरम्यानच्या मुलांमध्ये दिसून येत आहे.

वाचा-18 कोटी भारतीयांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज; सर्व्हेत समोर आली धक्कादायक माहिती

दुसरीकडे एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. अमिश वोरा यांनी या आजाराची काही लक्षणे सांगितली आहेत. त्यांच्या मते, 'पोटदुखीबरोबरच दोन ते तीन दिवस ताप, हगवण अशा तक्रारी. मात्र बहुतेक 100% रूग्णांना ताप येतोच. 80% मुलांना उलट्याही होतात. 60% मुलांचे डोळे लाल आहेत आणि इतरांच्या शरीरावर पुरळ आहे. ते काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वाचा-Oxford लसनिर्मितीच्या यशामागे आहे ही सुपरवुमन; आपल्या 3 मुलांवरच केली चाचणी

दरम्यान, डॉक्टर या विषयांवर संशोधन करीत आहेत. त्यांच्या निष्कर्षांबद्दल आयसीएमआरला माहिती दिली जात आहे. ते म्हणतात की जूनपासून मुंबईत ही प्रकरणे उघडकीस आली आहेत. चेन्नई, दिल्ली आणि जयपूरमध्येही अशी प्रकरणे नोंदली गेली आहेत.

वाचा-मुंबईतून आली चिंताजनक माहिती; आपल्याला कोरोना झाला हे 36% लोकांना माहितीच नाही

PMISची लक्षणं

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार PMIS ची लक्षणं सामान्य आहेत. जसं की, ताप, त्वचेवर पुरळ, डोळ्यांची जळजळ, पोटातील विकार. या आजाराची लक्षणे 10 महिन्यांपासून ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये दिसून आली, ज्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. रिपोर्टनुसार, या 18 पैकी 2 मुलांचा कोरोनातून निरोगी झाल्यानंतर या आजारामुळे मृत्यू झाला. वाडिया रुग्णालयाने इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (ICMR) याबाबत माहिती दिली आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india