Home /News /pune /

पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार!

पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार!

शेवटी संतापून पत्नीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    पुणे, 18 मे : पुण्यातील (Pune News) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक अत्यंत (Crime News) किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला त्याच्या दोन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. हा सर्व प्रकार सुरू असताना महिलेचा पती कोपऱ्यात उभं राहून हे पाहत होता. या प्रकारानंतर महिलेने (48 वय) पती आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती पत्नीला मानसिक त्रास देत होता. तिची इच्छा नसतानाही त्याने 2020 मध्ये हडपसर येथील एका लॉजवर मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. यानंतर जुलै 2021 मध्ये कोरेगाव पार्क परिसरात एका फ्लॅटवर दुसऱ्या एका मित्रासोबत पत्नीला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हे सर्व होत असताना पती मात्र कोपऱ्यात उभं राहून पाहत होता. हे सर्व वारंवार घडत असल्याने शेवटी संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. पतीच्या अशा कृत्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कोणता पती आपल्या पत्नीसोबत अशा प्रकारचं कृत्य करू शकतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gang Rape, Pune, Wife and husband

    पुढील बातम्या