Home /News /mumbai /

राज्यसभेत जाण्यासाठी संभाजीराजेंसमोर शिवसेनेचाच पर्याय? सेना खासदाराचे सूचक विधान

राज्यसभेत जाण्यासाठी संभाजीराजेंसमोर शिवसेनेचाच पर्याय? सेना खासदाराचे सूचक विधान

सातवा उमेदवार उभा राहिला तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ते पाहिलं कसं निवडणूक जिंकायची

सातवा उमेदवार उभा राहिला तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ते पाहिलं कसं निवडणूक जिंकायची

. सातवा उमेदवार उभा राहिला तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ते पाहिलं कसं निवडणूक जिंकायची.

मुंबई, 18 मे : राज्यसभा निवडणुकीवरून (rajya sabha election 2022) आता राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेनेनं दुसरी जागा लढवणार अशी घोषणा केल्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांची वाट बिकट झाली आहे. आता 'सातवा उमेदवार उभा राहिला तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ते पाहिलं कसं निवडणूक जिंकायची. पण आमचा उमेदवार हा आमच्याच पक्षाचा असेल, असे मला वाटते, असं म्हणत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Shiv Sena mp arvind sawant) यांनी सूचक विधान केले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा यासाठी संभाजीराजे यांनी सर्व पक्षांच्या आमदारांना आवाहन केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण, शिवसेनेनं दुसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूज18 लोकमतशी बोलत असताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संभाजीराजेंना नवा पर्याय सुचवला आहे. 'राज्यसभेच्या जागेवरून कुठलाही वाद नाही. गेल्यावेळी आम्ही राष्ट्रवादीला मदत केली होती. अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे सहाव्या जागेचा अधिकार हा शिवसेनेचा आहे. महाविकास आघाडी एकत्रित हा राज्यसभेची सहावी जागा जिंकेल' असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. (Video : काही सेकंदात पत्त्यासारखा वाहून गेला लोखंडी ब्रिज; पावसाचं रौद्र रूप ) ' राजकीय स्टेटमेंट देत लोकांमध्ये भेद निर्माण केला जात आहे. केंद्र सरकारचे सहकार्य नसतांना ही राज्य सरकार चांगले निर्णय घेत आहे. सातवा उमेदवार उभा राहिला तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ते पाहिलं कसं निवडणूक जिंकायची.पण राज्यसभेसाठी आमचा उमेदवार हा आमच्या पक्षाचा असेल, असे मला वाटते' असं सूचक विधान सावंत यांनी केलं. (इंद्राणीची लव्ह स्टोरी ते मुलीची मर्डर मिस्ट्री! जन्मदात्या आईने का घोटला गळा?) दरम्यान,  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे, शिवसेना सहावी जागा लढवणार आणि जिंकणार सुद्धा. राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे. असं ट्विट करत संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, राज्यसभा नियुक्तीसाठी  पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. अजून चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेना हा शिस्तीने चालणार पक्ष आहे, असे निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर होत नाहीत. याबद्दल निर्णय शिवसेनाप्रमुख घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत दिली आहे. काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या