मुंबई, 20 जुलै: आधार कार्ड (Aadhaar Card) हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. बँकेत खातं उघडण्यापासून ते अगदी सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत आधारकार्ड उपयोगी ठरतं. UIDAI आधार अपडेट करण्याची आणि नवजात बाळापासून प्रौढांपर्यंत आधार कार्ड बनवण्याची सुविधा देते. आधार कार्डमध्ये 12 अंकी आयडी असतो. त्यात बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती असते. आधार कार्डचा वापर वाढला असतानाच, काही विकृत लोक आता इतरांच्या आधार कार्डचा गैरवापर करून लोकांची फसवणूक करत आहेत. नुकतेच, गाझियाबाद पोलिसांनी एका टोळीला पकडलं आहे. ही टोळी बनावट आधार कार्ड बनवून फसवणूक करणार्यांना देत असे. अशा परिस्थितीत तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना, हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याची माहिती तुम्ही आधार कार्ड हिस्ट्री (Aadhar Card History) मधून अगदी सहजपणे पाहू शकता. याच्या मदतीने तुम्हाला तुमचं आधार किती वेळा वापरलं गेलं आहे आणि कोणीतरी इतर व्यक्ती त्याचा फायदा घेत नाही ना? याची माहिती मिळू शकते. तर चला जाणून घेऊया संपूर्ण तपशील… हेही वाचा: Aadhaar Cardला लिंक केलेला मोबाईल नंबर कसा बदलायचा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स आधार कार्ड हिस्ट्री कशी तपासायची? (How to Check Aadhaar Card Hostory?) -
- आधार कार्ड हिस्ट्री तपासण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट, uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल.
- आता तुम्हाला येथे My Aadhar या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला Aadhar Authentication History वर क्लिक करावं लागेल.
- यानंतर तुम्ही 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा.
- नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल, तो प्रविष्ट करा आणि पुढे जा.
- आता एक नवीन पेज उघडेल, ज्यानंतर तुम्हाला ती तारीख टाकावी लागेल ज्याची हिस्ट्री तुम्हाला पाहायची आहे.
- यानंतर तुमच्यासमोर आधार कार्डचा हिस्ट्री उघडेल, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापराची माहिती घेऊ शकता.
फसवणूक टाळण्यासाठी मास्क आधारचा वापर करा (Use Mask Aadhaar) - UIDAI ने वापरकर्त्यांना आधार मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे सर्वत्र वैध आहे आणि त्यात फक्त शेवटचे 4 अंक दिसतात. तुमच्या आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू नये म्हणून मास्क आधारमध्ये उर्वरित क्रमांक लपवले जातात.