शरद पवारांनी केलं मोदी सरकारच्या घोषणांचं स्वागत, मात्र व्यक्त केली 'ही' अपेक्षा

शरद पवारांनी केलं मोदी सरकारच्या घोषणांचं स्वागत, मात्र व्यक्त केली 'ही' अपेक्षा

शरद पवारांचं फेसबुक लाईव्ह, काय आहेत ठळक मुद्दे?

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या काही निर्णयांचं स्वागत केलं. मात्र त्याचवेळी काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.

'आजचं संकट गंभीर...दीर्घकालीन परिणाम करणारं आहे. प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारं हे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून मी घराबाहेर पडलो नाही. मी कुणालाही भेटलेलोही नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध संस्थांवर मोठी जबाबदारी आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून शेतकरी, असंघटीत कामगार, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याबाबत काही मागण्या केल्या आहेत.

काय आहेत शरद पवारांच्या मागण्या?

- सरकारने प्रभावी पावलं टाकली पाहिजेत

- जे काही निर्णय झाले त्यात शेतीच्या दृष्टीने आणखी निर्णय घेण्याची गरज....जे काही पॅकेज दिलं ते पुरसे नाही....पीक कर्ज भरणं आता अवघड होणार आहे

- शेतकऱ्यांना थकबाकीदार बनवून त्यांना मिळणारं नवीन कर्ज थांबवता कामा नये

- कापसाची खरेदी थांबली...कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे...त्याला मदत करण्याची गरज आहे.

- धान्य मोफत देण्याच्या निर्णयाचं स्वागत...पण त्याचा शेतकऱ्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्याची गरज

- असंघटित कामगारांचाही विचार करावा लागेल

शरद पवारांचं फेसबुक लाईव्ह, काय आहेत ठळक मुद्दे?

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या घोषणांचं स्वागत करुयात...

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार...त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार

वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांना सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला पाहिजे

विविध घटकांना केंद्र सरकारने मदत करण्याची गरज...यासाठी आम्ही सरकारसोबत असू

आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत...त्यासाठी सतर्क राहुयात...सरकारला सहकार्य करूयात

सरकार आणि विविध संस्थांच्या सूचनेला प्रतिसाद देण्याची गरज

प्रत्येक सूचना नाही पाळली तर...जबरदस्त किंमत मोजावी लागेल

धक्कादायक! 4 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, लहान मुलांमध्ये धोका वाढला

डास चावल्याने कोरोना होतो? या 7 गोष्टींवर अजिबात विश्वास

First published: March 27, 2020, 11:40 AM IST

ताज्या बातम्या