धक्कादायक! 4 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, लहान मुलांमध्ये धोका वाढला

धक्कादायक! 4 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, लहान मुलांमध्ये धोका वाढला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तर एका दिवसात देशभरात 88 नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर येत आहे.

  • Share this:

गुवाहाटी  , 27 मार्च : कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 700हून अधिक झाली आहे. वृद्ध आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण जास्त झालेली पाहायला मिळत आहे. तर, भारतात मृत झालेल्या 16 लोकांपैकी सर्व हे 60 वर्षांच्या वरचे आहेत. मात्र पहिल्यांदाच भारतात सर्वात कमी वयाचा रुग्ण आढळून आला आहे. आसामच्या जोरहाटमध्ये साढे चार वर्षांच्या मुलीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. आसाममधील कोरोनाचे हे पहिलेच प्रकरण आहे. तसेच देशातील आताच्या काळातील सर्वात लहान रुग्ण आहे.

झारखंडहून आसामला आली होती

सूत्रांच्या माहितीनुसार, ही मुलगी 19 मार्च रोजी आपल्या कुटुंबासमवेत झारखंडहून आसाम येथे आली होती. तिची तब्येत खराब झाल्यानंतर तिला आसामच्या जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (जेएमसीएच) मध्ये ठेवण्यात आले. तेथे तिची तपासणी झाली. या तपासणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. यापूर्वी आसाममध्ये कोरोना संसर्गाची नोंद झालेली नाही. राज्यातील कोरोनाची ही पहिली घटना आहे.

कोरोनामुळे सेलिब्रेटी बसलेत घरी पण शेवंता मात्र रमली आहे या कामात, पाहा VIDEO

जोरहाटच्या आयुक्तांनी तपासणीच्या प्राथमिक अहवालात मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पुढील तपासणीसाठी नमुने आयसीएमआर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या पहिल्या घटनेपासून आसाममध्ये विशेष खबरदारी घेतली गेली आहे आणि कोरोना पीडित व्यक्तीवर उपचार करण्यासाठी विशेष व्यवस्था केली गेली आहे.

एका दिवसात 88 नवे रुग्ण सापडले

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तर एका दिवसात देशभरात 88 नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर येत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे आकडे भीती आणि चिंता निर्माण करणारे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. कोरोना व्हायरसचा होणारा परिणाम लक्षात घेता भारत अजून तिसऱ्या टप्प्यात पोहोचला नाही ही दिलासा देणारी गोष्ट आहे.

दिवसभरात 15, एकूण 77 : वुहानसारखं मुंबई होणार देशातलं कोरोनाव्हायरसचं केंद्र?

First published: March 27, 2020, 9:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading