डास चावल्याने कोरोना होतो? या 7 गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका

डास चावल्याने कोरोना होतो? या 7 गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका

सोशल मीडियावर कोरोनाबाबत विविध अफवा पसरत असता. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी वाचा ही बातमी.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार होत आहे. अद्याप कोरोनावर उपचार करण्यासाठी कोणत्याही औषध सापडले नाही. त्यामुळं प्रसार रोखण्यासाठी लोकांना घरात राहण्यास सांगितले आहे. यातच सोशल मीडियावर विविध अफवा पसरत आहेत. त्यामुळं या 7 अफवांवर विश्वास ठेवण्याआधी सत्य जाणून घ्या.

दावा- 1. उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होईल?

सत्य- गेल्या काही दिवसांपासून गरमीमध्ये कोरोना तग धरू शकत नाही त्यामुळे उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होईल, असे सांगितले जात आहे. मात्र शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञांनी अद्याप यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये तापमान जास्त असले तरी, तेथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळं हा व्हायरस कसाही पसरू शकतो. त्यामुळं सतत हात धुणे, मास्कचा वापर करणे हे उपाय नक्की करा.

दावा-2. गरम पाण्याने आंघोळ केल्यास कोरोना मरतो?

सत्य- कोरोना विषाणू शरिराच्या 37 अंश तापमानापर्यंत जिवंत राहू शकतो. त्यामुळं गरम पाण्याने आंघोळ केल्यास कोरोना मरणार नाही. त्यामुळं यापेक्षा सतत सॅनिटायझरने हात साफ करत जा.

दावा-3. लसूण खाल्यामुळे कोरोना होत नाही?

सत्य- या दाव्याला कोणताही पुरावा नाही. लसूण औषधी असले तरी त्यामुळे कोरोना होणार नाही, हा दावा खोटा आहे.

दावा-4. न्यूमोनियाची लस घेतल्यास होणार नाही कोरोना?

सत्य-न्यूमोनियाची लस ही केवळ न्यूमोनिया तापावरचा गुणकारक आहे. कोरोनासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी लागतील.

दावा-5. डास चावल्याने कोरोना होतो?

सत्य-हा दावा सर्वात खोटा आहे. कोरोना व्हायरस हा डास चावल्यामुळे होत नाही. कोरोना व्हायरसची लक्षणे ही कोरडा खोकला, सर्दी, ताप, श्वसनास त्रास ही आहेत. तसेच, कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यास हा व्हायरस पसरतो.

दावा-6. दारू प्यायल्याने कोरोना होत नाही?

सत्य-दारू प्यायल्यामुळे किंवा अंगावर अथवा कपड्यांवर दारू शिंपडल्याने कोरोना जात नाही. त्याउलट तुम्हाला इनफेक्शन होऊ शकते. दारूने हात धुण्यापेक्षा साबणाने किंवा सॅनिटायझरने हात धुवावे.

दावा- 07. गोमूत्र प्यायल्यानं कोरोनाचा संसर्ग होत नाही?

सत्य- गोमूत्रात औषधी गुण असतात याबाबत शंकाच नाही. परंतु अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही की गोमूत्र पिणे किंवा गोबर गंध लागल्यास संसर्ग होणार नाही.

First published: March 27, 2020, 8:15 AM IST

ताज्या बातम्या