Home /News /mumbai /

सिल्व्हर ओकवरील बैठकीत आक्रमक रणनीती; एकनाथ शिंदे गटाचं संख्याबळ तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न?

सिल्व्हर ओकवरील बैठकीत आक्रमक रणनीती; एकनाथ शिंदे गटाचं संख्याबळ तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न?

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षासंदर्भात आता दिल्लीत महत्वाच्या घडामोडी होणार आहेत. बैठकीत सूचना देऊन शरद पवार आता दिल्लीत जाणार आहेत.

मुंबई 26 जून : राज्यातील राजकीय भूकंपादरम्यान महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे. यासाठी बैठकांनाही वेग आला आहे. नुकतंच शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीतही महत्त्वाची चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. सिल्व्हर ओक येथे झालेल्या बैठकीत आक्रमक रणनीती ठरली आहे. यावेळी शरद पवार (Sharad Pawan Meeting) यांनी कमान हाती घेतली आहे. झाडी..डोंगर..हॉटेल आता विसरा, बॅगा भरा! आमदार 48 तासांत मुंबईत येणार? महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षासंदर्भात आता दिल्लीत महत्वाच्या घडामोडी होणार आहेत. बैठकीत सूचना देऊन शरद पवार आता दिल्लीत जाणार आहेत. BREAKING : आता शिंदेंच्याच गटात बंडोबा करणार तांडव, संजय राऊतांनी टाकला डाव? या बैठकीत काय ठरलं ? - गुवाहाटीत गेलेल्या आमदारांना संपर्क करा - त्यांना परत आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा - एकनाथ शिंदे गटाकडे असलेलं संख्याबळ तोडा - राज्यपाल राजभवनावर आले आहेत, त्यांना संपर्क करण्याचा निर्णय - तांत्रिक मुद्द्यांवर, विधिमंडळ कायद्याचा प्रभावी वापर करण्याबाबत बातचीत - हायकोर्टात बाजू मांडण्याची वेळ येऊ शकते, याबाबतही चर्चा - वकिलांसोबत प्रफुल्ल पटेल आणी अनिल देसाई आखणार रणनीती दरम्यान बंडखोर आमदारांपैकी अनेकजण आपल्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, गुवाहाटीमधील काही आमदारांसोबत आत्ताच माझं बोलणं झालं आहे. त्यांची परत शिवसेनेसोबत येण्याची इच्छा आहे. ज्यांना परत यायचं आहे, त्यांच्यासाठी आमची दारं, खिडक्या सगळं खुलं आहे. गुवाहाटीमध्ये काय आहे? मुंबईत या...इथे पार्टी करा, असं आवाहन संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Eknath Shinde, Sharad pawar अध्यक्ष

पुढील बातम्या