Home /News /mumbai /

BREAKING : आता शिंदेंच्याच गटात बंडोबा करणार तांडव, संजय राऊतांनी टाकला डाव?

BREAKING : आता शिंदेंच्याच गटात बंडोबा करणार तांडव, संजय राऊतांनी टाकला डाव?

शिंदे गटात दाखल झालेले अनेक आमदार हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

शिंदे गटात दाखल झालेले अनेक आमदार हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

शिंदे गटात दाखल झालेले अनेक आमदार हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

      मुंबई, 26 जून : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांच्या बंडाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांशी बोलणं होत असल्यामुळे शिंदेंच्या गटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिंदेंच्या गटात बंड होण्याची चिन्ह आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 38 आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. गुवाहाटीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून आमदार तळ ठोकून आहे. पण, महाराष्ट्रातून शिंदे गटात दाखल झालेले अनेक आमदार हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. खुद्द संजय राऊत यांनीच आमदारांशी बोलणं होत असल्याचा दावा केला आहे. एकतर मागील पाच दिवसांपासून आमदार गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहे, त्यात शिवसेनेनं कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आमदारांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये बंड होण्याची चिन्ह आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये असलेल्या अनेक आमदारांशी संजय राऊत यांचं बोलणं झालं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या सोबत कोण बोलतंय, असा सवाल उपस्थितीत झाला आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात करून आता राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. गुवाहाटीमधील आमदार येत्या ४८ तासात मुंबईमध्ये परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज रात्री किंवा उद्या रात्री सर्व आमदार मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे समर्थकांना मुंबई विमानतळावर जमण्याच्या सुचना देण्यात आली आहे. मुंबई विमानतळाला देखील अलर्ट दिला गेला आहे. राज्यपाल आपला विशेषाधिकार वापरुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, शिंदे गटाच्या वकिलांची एक टीम हायकोर्ट आणि एक टीम सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची तयारी करत आहे. एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी 12 च्या सुमारास आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमदारांमध्ये सल्लामसलत होणार आहे. विधानसभा उपाध्यक्षाकडून गटनेता आणि प्रतोद नियुक्तीचा निर्णय न झाल्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता गटनेता नियुक्तीचा वाद हा आता राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या