शरद पवारांची राजेश टोपे यांच्या कुटुंबीयांबद्दल भावूक पोस्ट

शरद पवारांची राजेश टोपे यांच्या कुटुंबीयांबद्दल भावूक पोस्ट

कोरोनाशी मैदानात लढा देणारे राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनामुळे टोपे कुटुंबीयांसह राष्ट्रवादीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचं मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे टोपे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत भावूक पोस्ट लिहिली आहे.

'सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबीयांचे सांत्वन करताना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो' अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

'माझे दिवंगत सहकारी आणि मित्र कर्मयोगी अंकुशराव टोपे यांना शारदाताईंनी आयुष्यभर निष्ठेने साथ दिली. अंकुशराव टोपे यांच्या निधनानंतर त्या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहिल्या.' असं सांगत शरद पवारांनी अंकुशराव टोपे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

'अंकुशराव टोपे यांचे सुपुत्र राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीतेने हाताळताना आपल्या मातोश्रींच्या आरोग्याचीही अखेरपर्यंत योग्य काळजी घेतली.' असं सांगत  शरद पवार यांनी आपले कुटुंबीय व पक्षाच्या वतीने दिवंगत शारदाताई अंकुशराव टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली' अर्पण केली.

शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर दाखल होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र, पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याची माहिती मिळताच मुंबईत रात्री हॉस्पिटलमध्ये जाऊन खासदार सुप्रिया सुळे आणि संदानंद सुळे यांनी राजेश टोपे यांच्या मातोश्री यांच्या पार्थिंव दर्शन घेतले. पहाटे 3 ते 4 च्या सुमारास शारदाताईंचं पार्थिव मुंबईतून जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले.

शारदाताई या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.  त्यांच्यावर आज रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंची सांत्वन भेट

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे.  'ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. 4 वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशिर्वाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील', अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला.  टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले.

Published by: sachin Salve
First published: August 2, 2020, 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading