शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अशा तयार झाल्या सोनिया गांधी, पवारांनी उघड केलं गुपित

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अशा तयार झाल्या सोनिया गांधी, पवारांनी उघड केलं गुपित

'आणीबाणीलाही शिवसेनेने समर्थन दिलं होतं. इंदिरा गांधींना समर्थन दिलं होतं. प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असतानाही शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. हे सगळं मी सनिया गांधींना सांगितलं होतं.'

  • Share this:

मुंबई 02 डिसेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी स्वप्नातही घडेल असं वाटलं नव्हतं ते झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि महाराष्ट्रात नवं सरकार आलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. हे सगळं घडविण्याचे शिल्पकार होते शरद पवार. त्यांनी गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांचा पहिल्यांदाच खुलासा केलाय. यात सगळ्यात मोठं काम होतं ते सोनिया गांधी यांचं मन वळविण्याचं. पवारांनी आपलं सर्व कौशल्य पणाला लावून सोनिया गांधींना कसं वळवलं हे पवारांनी पहिल्यांदाच स्पष्ट केलं. शरद पवार म्हणाले, विधानसभा निकालानंतर लोकांनी आम्हाला  विरोधी पक्षात बसण्याचा आदेश दिला होता. तो आम्हाला मान्यही होता. आम्ही विरोधात बसण्यास तयार आहोत असंही आम्ही कायम सांगितलं होतं. मात्र निकालानंतर चित्र बदलून गेलंय. भाजप आणि शिवसेनेचं जमत नाही हे पुढे येत होतं. भाजपमध्येही असंतोष होता.

आपणच कायम दुय्यम भूमिका घ्यायची का? असा प्रश्न शिवसेनेच्या काही नेत्यांना पडला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असं त्या पक्षातल्या नेत्यांना वाटत होतं. त्यामुळे पुढे घटना घडत गेल्या. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गुपीत उघड केलं.

PM मोदी आणि अमित शहा दोन दिवस पुणे मुक्कामी, ठाकरे CM झाल्यानंतरचा पहिलाच दौरा

शिवसेनेने एकत्र येण्यासंबंधी विश्वास दिल्यानंतर मी थेट सोनिया गांधींना जाऊन भेटलो आणि त्यांना विश्वास दिला. माझ्या प्रचारामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनाही फायदा झाला. ते नेते माझ्या संपर्कात होते. त्यांना माझ्याबद्दल आस्था होती. त्यामुळे भाजपविरोधात ते एकत्र येण्यास तयार होते.

काँग्रेसचे नवे आमदार हे भाजप विरोधात एकत्र येण्यास तयार होते.  देशात नवा पॅटर्न राबवू शकतो असं त्यांना वाटत होतं. त्यांची तयारी असल्यामुळे आम्ही पुढे गेलो. त्यामुळे प्रश्न होता तो काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाचा. सोनिया गांधी यांच्याशी मीच बोलावं असं काँग्रेसच्या नेत्यांनाही वाटत होतं.

'पंकजा मुंडे यांचा भाजपमधल्याचं लोकांनी गेम केला'

काँग्रेस हा कायम कट्टर विचाराविंरुद्ध लढत  असतो. त्यामुळे शिवसेनेसोबत कसं जायचं असा त्यांना प्रश्न होता. आणीबाणीलाही शिवसेनेने समर्थन दिलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळात इंदिरा गांधींना समर्थन दिलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत बाळासाहेबांनी उमेदवारच उभे केले नाही ही मोठी गोष्ट होती. प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असतानाही शिवसेनेनं पाठिंबा दिला होता.  हे सगळं मी सनिया गांधींना सांगितलं होतं. त्यामुळे शेवटी त्या तयार झाल्या असं पवारांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 2, 2019, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading