'पंकजा मुंडे यांचा भाजपमधल्याचं लोकांनी गेम केला'

'पंकजा मुंडे यांचा भाजपमधल्याचं लोकांनी गेम केला'

'भाजपमध्ये काहीच गोलमाल नसतं तर भाजप मधील दोन नेते असलेले पंकजा मुंडे कुठे जाणार नाहीत हे सांगण्याची वेळ आली नसती. त्यांच्याशी विधानसभा निवडणुकीत राजकारण झालं.'

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 02 डिसेंबर : पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे भाजपमध्ये वादळ निर्माण झालं. पंकजा मुंडे आता कुठली भूमिका घेतात याकडे आता सगळ्याचं लक्ष लागलंय. 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांची जयंती असते. त्यावेळी गोपीनाथ गडावर पंकजाताई शक्तिप्रदर्शन करणार असून आपला पुढचा मार्ग निश्चित करणार आहेत. भाजपमधली ही अस्वस्था पाहून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय. भाजपच्याच लोकांनी पंकजा मुंडे याचा गेम केला असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. ज्यांचा त्यांनी गेम केला त्यांच्यावर त्या नेम धरतील असा टोलाही त्यांनी लगावलाय.

वडेट्टीवार म्हणाले, पंकजा मुंडे यांच्याशी विधानसभा निवडणुकीत राजकारण झालं. भाजपमध्ये काहीच गोलमाल नसतं तर भाजप मधील दोन नेते असलेले पंकजा मुंडे कुठे जाणार नाहीत हे सांगण्याची वेळ आली नसती. बहुजनांना डावलू शकत नाही सत्ता चालवू शकत नाही हे पंकजा मुंडे दाखवून देतील असंही ते म्हणाले.

या' कारणांमुळे अस्वस्थ आहेत पंकजा मुंडे

मंत्री मंडळ विस्तार कसा करायचा याचा सर्वस्वी अधिकार हा पक्ष श्रेष्ठीना आहे. पक्ष श्रेष्ठींकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू आहे. दोन तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, चेतक महोत्सवात मोठा घोटाळा झाला आहे. भाजप सरकार आपल्या मंत्र्यांना नेहमी क्लीन चिट देत आले. चेतक महोत्सव घोटाळ्यातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी आम्ही मागणी केलीय.

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? भाजपने पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

फेसबुक नंतर ट्विटरवरून भाजप हटवलं

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजप हा शब्द काढला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे. खरंतर, पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या सध्या शांत असून त्याचं नेमकं काय चाललंय याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे. त्यातच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या