वैभव सोनावणे, पुणे 02 डिसेंबर : महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या प्रयोगाची सुरुवात झाली. भाजपविरोधात सर्वच पक्ष एकत्र आल्यानंतरही सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. या महाराष्ट्र पॅटर्नची देशभर चर्चा सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पुण्यात येत आहेत. हे दोनही दिग्गज नेते पोलिसांच्या एका परिषदेसाठी पुण्यात येत असून त्यांचा दोन दिवस शहरात मुक्काम असणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
‘पंकजा मुंडे यांचा भाजपमधल्याचं लोकांनी गेम केला’
देशातल्या सर्व राज्यांचे पोलीस प्रमुख आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी यांची परिषद दरवर्षी होत असते. त्या बैठकीला पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित राहतात. 2014 पर्यंत ही बैठक दिल्लीत होत असे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये दरवर्षी दिल्ली बाहेर ही परिषद घेण्याचा पायंडा मोदींना पाडला. त्यानुसारच ही परिषद यावर्षी पुण्यात होत आहेत. देशभरातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा, राज्य स्तरावर पोलीस दलांमध्ये करायचे आवश्यक बदल, पोलीस आणि गुप्तचर संस्थांमध समन्वय वाढवणं असे अनेक विषय या बैठकीत चर्चेला येणार आहेत. यंदा ही बैठक पुण्यात 6 ते 8 डिसेंबर अशी होणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.
‘या’ कारणांमुळे अस्वस्थ आहेत पंकजा मुंडे
या परिषदेला सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक, गुप्तचर संस्थांचे प्रमुख, ज्येष्ठ पोलीस अधिकारी, गृहमंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उप सुरक्षा सल्लागार दत्ता पडसलगीकर हेही या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

)







