Home /News /mumbai /

कंगना Vs शिवसेनेच्या वादावर पहिल्यांदाच बोलले शरद पवार, म्हणाले...

कंगना Vs शिवसेनेच्या वादावर पहिल्यांदाच बोलले शरद पवार, म्हणाले...

जनतेवर अशा लोकांच्या वक्तव्यामुळे काही परिणाम होतो का हे पाहणे महत्त्वाचे असते. पण लोकं अशा वक्तव्य आणि लोकांना गंभीरपणे घेत नाही.

मुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. कंगनाने मुंबई पाकव्याप्त भाग असल्याचे वक्तव्यामुळे शिवसेनेचे नेते विरुद्ध कंगना असा 'पंगा' सुरू आहे. अखेर या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेनेला सबुरीचा सल्ला दिला आहे. 'पोलीस दलच मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षेसाठी काम करत आहे आणि  हे सामान्य जनतेला माहीत आहे. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी जनता त्याला फारसा गंभीरपणे घेत नाही' असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले. शिवसेनेची तलवार म्यान! कंगनाविरोधात एअरपोर्टवर आंदोलन करु नका, पक्षादेश त्याचबरोबर, 'मुंबईतील लोकं आणि महाराष्ट्राची जनताही सुज्ञ आहे. जनतेवर अशा लोकांच्या वक्तव्यामुळे काही परिणाम होतो का हे पाहणे महत्त्वाचे असते. पण लोकं अशा वक्तव्य आणि लोकांना गंभीरपणे घेत नाही.  त्यामुळे तुम्हीही अशा लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नका', असा सल्ला शरद पवार यांनी शिवसेनेला आणि सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. 'मुंबईत अनेक बांधकाम अवैध असतील, ही कारवाई केल्याने विनाकारण बोलण्याला संधी उपलब्ध करून देणे आहे. अधिकारी यांनी असा निर्णय का घेतला बघावं लागेल', असंही शरद पवार म्हणाले. कंगनाच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धमकी देणारे फोन आले. यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. कंगनाच्या ऑफिसमध्ये काय आहे बेकायदेशीर बांधकाम? जाणून घ्या हे 10 महत्त्वाचे मुद्दे 'मला यापूर्वी ही अनेक धमक्यांचे फोन आले होते. मी त्यावेळीही त्याला गंभीरपणे घेतले नाही आणि आजही गंभीरपणे घेत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. तसंच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतःला किती धमक्यांचे फोन आले त्याची यादी दाखवली आहे. त्यामुळे यावर आणखी काय बोलावे, असं मिश्किल उत्तरही शरद पवार यांनी दिले. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या फार्म हाऊसची रेकी करणारे ATSच्या ताब्यात दरम्यान,  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचे फोन आल्यानं खळबळ उडाली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसची रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खालापूर तालुक्यातील भिलवले येथील बगंल्यावर मगंळवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली. मुबंई दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) नवी मुबंई टोल नाक्यावर आरोपींना ताब्यात घेतलं आहे. फक्त 27 चेंडूत संपला सामना, मोडला मुंबई इंडियन्सचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड खालापूर तालुक्यातील भिलवले येथील बगंल्यावर मगंळवारी सायंकाळी टुरीस्ट कारने काही लोक रेकी करण्यासाठी आले होते. 3 ते 4 जण होते. फार्म हाऊसच्या गेटवरील सुरक्षारक्षकांकडे या इम्तियाज नावाच्या व्यक्तीची चौकशी केली आणि नंतर कार मुबंईकडे रवाना झाली. घटनेचं प्रसंगावधान राखून फार्म हाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडी नबंर नोट करून तातडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुबंई पोलिसांना कळवला. या घटनेची दखल घेत मुबंई ATSनं कार नवीमुबंई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. काल रात्रीपासून आरोपींची ATS कडून कसून चौकशी सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Shivsena

पुढील बातम्या