नवी दिल्ली, 09 सप्टेंबर : आयपीएलचा (IPL 2020) तेरावा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्याआधीच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीग (Caribbean Premier League) मधील संघ सेंट लूसिया जूक्सने मुंबईचा रेकॉर्ड मोडला आहे. लूसिया संघाने गयाना अॅमेजन वॉरिअर्सला 93 चेंडू शिल्लक ठेवून हरवले. या टी-20 लीगमध्ये सर्वात जलद आव्हान पूर्ण केलेला हा एकमेव संघ आहे.
याआधी मुंबईनं आयपीएलमध्ये 2008 च्या हंगामात कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) संघाविरुद्ध 68 धावांचे लक्ष्य 87 चेंडू राखून पार केले होते. लूसिया संघाने 4.3 ओव्हरमध्येच म्हणजे 27 चेंडूत हा सामना जिंकला.
वाचा-'हे' 4 खेळाडू घेऊ शकतात सुरेश रैनाची जागा, धोनीशी आहेत चांगले संबंध
कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या (CPL) दुसऱ्या सेमीफायल सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना गयानाचा संपूर्ण संघ केवळ 55 धावांवर बाद झाला. टी-20 लीगच्या नॉकआउट राउंडमध्ये ही सर्वात कमी खेळी ठरली आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना लूसिया संघाने हे आव्हान केवळ 4.3 ओव्हरमध्ये पार केले. याआधी 2004मध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये झालेल्या प्रो20 लीगमध्ये एका संघाने 47 धावा केल्या होत्या.
वाचा-विराट आणि एबी डिव्हिलियर्सला मिळाली 'शांती', आता होणार 2016 सारखा चमत्कार!
संपूर्ण गायाना संघाने लुसियाच्या गोलंदाजांसमोर हात टेकले. गायनाकडून केवळ चंद्रपोल हेमराजला सर्वाधिक 25 धावा करता आल्या. त्याच्याशिवाय कोणत्याही फलंदाजाने 11 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. गयानाचा संपूर्ण डाव 13.4 षटकांत संपला. त्यानंतर या आव्हानाचे पाठलाग करताना 10 विकेटनं रहकीम कॉर्नवालनं 17 चेंडूत 32 धावा करत हा सामना जिंकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai Indians