मुंबई, 29 जून : ‘पहाटेच्या शपथविधीबाबत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारा यांनी ऐनवेळी भूमिका बदलली. सरकार स्थापनेला पवारांची साथ होती पण त्यांनी दुहेरी खेळी खेळली’ असा खुलासा फडणवीस यांनी केला. राज्यात गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत आता नव्यानं मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महागौप्यस्फोट केला आहे. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे गौप्यस्फोट केले आहे. (कातळशिल्पे संरक्षण आणि संवर्धनासाठी शिंदे- फडणवीस सरकारचं मोठं पाऊल) त्यावेळी सरकार स्थापनेला पवारांचा पूर्ण पाठिंबा होता मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती. तर आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपावण्यात आल्या होत्या असं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच ’ शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला. काय म्हणाले फडणवीस? ‘पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली. त्यावेळी सरकार स्थापनेला शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा होता. मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती. तर, आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपावण्यात आल्या होत्या. शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.